मुंबई : एअर एशियाने वर्षअखेरनिमित्त स्वस्तात विमान प्रवास करण्याची योजना जाहीर केली असून, या योजनेंतर्गत देशांतर्गत विमान प्रवास अवघ्या १,२९९ रुपयांत, तर आंतरराष्ट्रीय प्रवास २,३९९ रुपयांत करता येणार आहे. ही सवलत योजना मर्यादित काळासाठी आहे. योजनेतील तिकीट बुकिंग सुरू झाले असून, १५ आॅक्टोबरपर्यंत तिकीट बुकिंग करता येईल; तसेच ३१ मार्च २०१८ पर्यंत प्रवास करता येणार आहे.
एअर एशियाच्या नेटवर्कमध्ये बंगळुरू, रांची, हैदराबाद, पुणे, कोलकाता, कोची आणि नवी दिल्ली इत्यादी ठिकाणांसाठी उड्डाण करण्याची सोय त्यात आहे. आंतरराष्ट्रीय मार्गावरील किमान तिकिटाची किंमत २,३९९ रुपये आहे. क्वालालंपूर, बाली, बँकॉक, कारबी, फुके, मेलबोर्न, सिडनी, सिंगापूर, आॅकलँड या गंतव्य स्थानांचा त्यात समावेश आहे. एशिया, आॅस्ट्रेलिया, न्यू झीलंड, पूर्व आशिया आणि अमेरिका या देशांतील २० गंतव्य स्थानांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे.
१,२९९ रुपयांमध्ये करा विमान प्रवास
एअर एशियाने वर्षअखेरनिमित्त स्वस्तात विमान प्रवास करण्याची योजना जाहीर केली असून, या योजनेंतर्गत देशांतर्गत विमान प्रवास अवघ्या १,२९९ रुपयांत, तर आंतरराष्ट्रीय प्रवास २,३९९ रुपयांत करता येणार आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 04:14 AM2017-10-04T04:14:27+5:302017-10-04T04:14:54+5:30