Join us

सर्व दुचाकी, तीन चाकी इलेक्ट्रिक करा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 7:43 AM

जी-२० शेर्पा अमिताभ कांत; ...तर ‘चॅम्पियन’ बनण्याची संधी हुकणार

पणजी : भारताने २०३० पर्यंत सर्व दुचाकी आणि तीन चाकी वाहने इलेक्ट्रिक करण्याचे लक्ष्य ठेवायला हवे, असे भारताचे जी-२० शेर्पा अमिताभ कांत यांनी बुधवारी म्हटले, २०३० पर्यंत ६५ टक्के सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रिक वाहनांद्वारे करण्याचे देशाचे उद्दिष्ट असायला हवे, असेही कांत म्हणाले.पणजी येथे भारताच्या जी-२० अध्यक्षतेखाली ऊर्जा संक्रमणावरील कार्यगटाच्या चौथ्या बैठकीदरम्यान ते बोलत होते.

इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढीसाठी भारत जो मार्ग स्वीकारेल तो अमेरिका आणि युरोपपेक्षा वेगळा असेल. जर भारत इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात पुढे जाऊ शकला नाही, तर तो जगातील ऑटोमोटिव्ह क्षेत्रात जागतिक ‘चॅम्पियन’ बनण्याची संधी गमावेल, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :बाईकइलेक्ट्रिक कार / स्कूटर