Join us

आॅटो कंपन्यांचा भर ‘मेक इन इंडिया’वर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 5:48 AM

सुट्या भागांची खरेदी : ५००० छोट्या कंपन्यांना संधी

मुंबई : वस्तूची प्रत्यक्ष निर्मिती व निर्यात करण्याच्या क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ फार यशस्वी ठरलेले नाही, पण भारतातच वाहननिर्मिती करणाऱ्या मोठ्या विदेशी आॅटो कंपन्यांनी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत सुट्या भागांची भारतीय कंपन्यांकडून खरेदी सुरू केली आहे. काही कंपन्या ९८ टक्के सुटे भाग येथील छोट्या कंपन्यांकडून खरेदी करीत आहेत.

रेनॉ, ह्युंदाई, फोक्सवॅगन, होंडा यासारख्या मोठ्या विदेशी कंपन्यांनी भारतात त्यांचे उत्पादन युनिट सुरू केले आहे. त्यामुळे त्यांची वाहने आयात होणाºया गाड्यांपेक्षा स्वस्त झाली आहेत. त्यातून देशात चारचाकींची विक्री वाढत आहे. या कंपन्या वाहनांसाठी लागणारे महत्त्वाचे भाग विदेशातून आयात करतात, पण प्रत्येक वाहनात गरज असलेले शेकडो सुटे भाग या कंपन्या भारतीय सूक्ष्म व लघू कंपन्यांकडून खरेदी करीत आहेत. त्या क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ काही प्रमाणात यशस्वी ठरले आहे. रेनॉसारखी कंपनी त्यांच्या गाड्यांच्या निर्मितीसाठी लागणारे ९८ टक्के सुटे भाग स्थानिक कंपन्यांकडून खरेदी करीत आहेत. वार्षिक साधारण ४ लाख गाड्यांची निर्मिती करण्यासाठी सुट्या भागाचा पुरवठा ४०० हून अधिक छोट्या-मोठ्या कंपन्या करीत आहेत. देशभरातील अशा ५ हजार कंपन्यांकडून आज सुटे भाग खरेदी करीत आहेत.वस्तूला कमी; भारतीय प्रतिभेला मागणीभारतातीय प्रतिभेला जगभरात मागणी आहे, पण भारतीय वस्तुंना विदेशात फार मागणी नाही. यामुळे ‘मेक इन इंडिया’अंतर्गत निर्यात सध्या तरी अशक्य आहे.आॅटोमोबाइलखेरीज मोबाइल हँडसेट, संरक्षण उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या क्षेत्रांकडूनही भविष्यातील ‘मेक इन इंडिया’ची सुरुवात झाली आहे. त्याचे निकाल हळूहळू दिसतील, असे या क्षेत्रातील उद्योजकांचे मत आहे.

टॅग्स :मेक इन इंडिया