Lokmat Money > बिझनेस न्यूज > मेक इन इंडिया: ब्रिटिश कंपनी भारतात बनविणार स्मार्टफोन; नोकऱ्याही मिळणार

मेक इन इंडिया: ब्रिटिश कंपनी भारतात बनविणार स्मार्टफोन; नोकऱ्याही मिळणार

विशेष म्हणजे, पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने फाेनमध्ये सुटे भाग वापरण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 10:08 AM2023-06-07T10:08:17+5:302023-06-07T10:08:37+5:30

विशेष म्हणजे, पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने फाेनमध्ये सुटे भाग वापरण्यात येणार आहे.

make in india british company nothing to make smartphones in india jobs will also be available | मेक इन इंडिया: ब्रिटिश कंपनी भारतात बनविणार स्मार्टफोन; नोकऱ्याही मिळणार

मेक इन इंडिया: ब्रिटिश कंपनी भारतात बनविणार स्मार्टफोन; नोकऱ्याही मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : स्मार्टफाेन उत्पादक कंपन्यांना भारतातील उत्पादन क्षेत्र खुणावत आहे. आता ॲपलपाठोपाठ ब्रिटनची बलाढ्य कंझुमर टेक्नॉलॉजी ब्रँड ‘नथिंग’ने आपला आगामी स्मार्टफोन ‘फोन (२)’ भारतात बनविण्याची घोषणा केली आहे. हे ‘मेक इन इंडिया’ योजनेचे मोठे यश मानले जात आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने फाेनमध्ये सुटे भाग वापरण्यात येणार आहे.

भारतात ‘ॲपल’च्या स्मार्टफाेनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. या उत्पादनांची देशातून निर्यातही वाढले आहे. आता ब्रिटनमधील ब्रँड भारतात उत्पादन सुरू करणार आहे. त्यामुळे सुमारे १० ते १२ हजार जणांना रोजगार मिळेल, असा अंदाज आहे. ‘फोन (२)’ मध्ये फेरवापर केलेले जैवाधिष्ठित सुट्या भागांचे प्रमाण तिप्पट अधिक असणार आहे. त्याचे अनबॉक्सिंग पूर्णत: प्लास्टिकमुक्त असेल. त्याचे अंतिम जुळवणी प्रकल्प फेरवापरक्षम (रिन्युएबल) ऊर्जेवर चालतील.

भारतच का?

- नथिंग इंडियाचे वीपी आणि जीएम मनु शर्मा यांनी सांगितले की, स्मार्टफोनच्या आयकॉनिक ट्रान्सपरंट डिझाइनसाठी आवश्यक उत्पादन क्षमता आणि अचूक अभियांत्रिकी तंत्रज्ञान भारतात उपलब्ध आहे. 

- त्यामुळे फोन (२) भारतात बनविण्यास आम्ही उत्सुक आहोत. तरुण ब्रँड असल्यामुळे आम्ही ‘अर्थ-फर्स्ट’ दृष्टिकोनास प्राधान्य देतो.

 

Web Title: make in india british company nothing to make smartphones in india jobs will also be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.