हॉटेल चेन ओयोचे (OYO) सीईओ रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) यांनी त्यांच्या अनुभवाविषयी सांगताना तरुण उद्योजकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. शून्यापासून सुरुवात केल्यानंतर एक प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन करण्यासाठी काय करावं लागेल, याबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टद्वारे रितेश अग्रवाल यांनी तरुण उद्योजकांना मार्गदर्शन केलंय. रितेश अग्रवाल यांना यशस्वी उद्योजक होण्याच्या मार्गावर अनेक चढ उतारांचा सामना करावा लागला होता. आपल्या अनुभवाच्या आधारे त्यांनी तरुण उद्योजकांना त्याच त्याच चुका पुन्हा करू नका असं त्यांनी सांगितलं.
"चुका करा, पण त्याच त्याच पुन्हा करू नका, हेच मी तरुण उद्योजकांना सांगतो," असे रितेश अग्रवाल म्हणाले. मी नेहमीच तरुण उद्योजकांना मार्गदर्शक आणि मार्गदर्शन करण्यासाठी खूप उत्साही असतो. ते कोणत्याही संसाधनांशिवाय स्टार्टअप सुरू करण्याच्या माझ्या अनुभवातून लगेच शिकू शकतात. स्टार्टअप कम्युनिटीला माझ्याकडून जितकं अधिक देता येईल, तितका मला आनंदच आहे," असंही ते त्यांनी नमूद केलं.
अनेक युझर्सकडून कौतुक
रितेश अग्रवाल यांच्या पोस्टवर अनेक यूजर्सनी त्यांच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. तरुण आणि नवोदित फाऊंडर्सना मदत केल्याबद्दल अनेक युझर्सनं त्यांचं कौतुक केलं. "उत्कृष्ट सल्ला! तुमच्या चुकांमधून शिकणं ही प्रगती आणि यशाची गुरुकिल्ली आहे. तरुण उद्योजकांना सल्ला देणं आणि मार्गदर्शन करणं तुमचे अनुभव सांगणं आणि नुकसानीपासून बचवण्यास मदत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे," असं एका युझरनं म्हटलंय. तर चुकांमधून शिकणं हे प्रगतीसाठी उत्तम आहे. स्टार्टअप कम्युनिटीला सल्ला देणं आणि स्टार्टअप कम्युनिटीला जितकं अधिक देता येईल ही इच्छा व्यक्त करणं उल्लेखनीय असल्याचं आणखी एका युझरनं म्हटलं.