भविष्यासाठी चांगली बँक बॅलन्स तयार करणं खूप महत्वाचं आहे. चांगल्या स्कीम्समध्ये पैसे योग्य प्रकारे गुंतवले तर तुमचा चांगला बँक बॅलन्स होऊ शकतो. तुमच्या मुलांना लखपती बनवायचं असेल तर तुम्हाला आतापासूनच तयारीला लागायला हवं. आज आम्ही तुम्हाला एका अशा स्कीमबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांच्या नावावर पैसे जमा करू शकता. ही स्कीम उत्तम व्याजासह अनेक फायदेही देते. तुम्ही तुमच्या मुलांसाठी लाखो रुपयांचा निधी तयार करू शकता. जाणून घेऊया याबद्दल अधिक.
तुम्हाला तुमच्या मुलांसाठी चांगला निधी जमवायचा असेल तर तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत सध्या ७.१ टक्क्यांचं वार्षिक व्याज दिलं जातं. या योजनेत (Public Provident Fund) एक व्यक्ती फक्त एका मुलाच्या नावाने खाते उघडू शकते. नियमांनुसार, जर एखाद्याला दोन अपत्ये असतील तर एका अल्पवयीन मुलाचे पीपीएफ खाते (Public Provident Fund) आई आणि दुसऱ्याचे वडील उघडू शकतात. दोन्ही पालक एकाच मुलाच्या नावाने अल्पवयीन पीपीएफ खाते उघडू शकत नाहीत. एका आर्थिक वर्षात पीपीएफ खात्यात किमान ५०० रुपये आणि कमाल १.५ लाखांपर्यंतची मर्यादा आहे.
इथे उघडू शकता खातं
तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खातं उघडू शकता. एक व्यक्ती केवळ एकच पीपीएफ खाते उघडू शकते. अल्पवयीन मूल १८ वर्षांचे झाल्यानंतर, खात्याची स्थिती मायनर वरून मेजर करण्यासाठी अर्ज द्यावा लागतो. त्यानंतर ते मूल स्वत: आपलं खातं हाताळू शकते. काही विशेष प्रकरणांमध्ये, ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर खाते बंद केले जाऊ शकते. जर तुम्हाला मुलाच्या उच्च शिक्षणासाठी किंवा आजारपणाच्या उपचारासाठी पैशांची गरज असेल तर अशा स्थितीत हे खातं बंद करता येतं.