कोलकाता - देशभरातील शॉपिंग मॉल्सचा विस्तार तीन ते चार वर्षांत ३५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. रेटिंग एजन्सीने क्रिसिलने बुधवारी जारी केलेल्या अहवालातून हे समोर आले आहे. मागच्या वर्षी किरकोळ विक्री सुधारल्याने शॉपिंग मॉलचा आणखी विस्तार होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
येत्या काही दिवसांत किरकोळ विक्री क्षेत्रात तीन ते साडे तीन कोटी चौरस फुटांची वाढ होण्याची शक्यता आहे. विभिन्न भौगोलिक क्षेत्रांमध्ये मागणीतील लवचिकतेमुळे या क्षेत्राच्या वृद्धीस चालना मिळेल. मॉल आणि संबंधित क्षेत्रात गुंतवणूक करण्यास लोक इच्छुक आहेत, असे अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
महसूल १२५% पर्यंत वाढीची शक्यता
- या अहवालात म्हटले आहे की, पुढील तीन ते चार वर्षांत मॉलच्या क्षेत्रात २० हजार कोटींची गुंतवणूक येण्याची शक्यता आहे.
- कोरोनामुळे वाढीला बसलेली खीळ दूर झाली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात मॉलमालकांचा महसूल १२५ टक्क्यांच्या आसपास वाढण्याची शक्यता आहे.