मुंबई/नवी दिल्ली : कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्याला नव्या कायद्यान्वये फरार घोषित करून, त्यांची १२,५00 कोटींची संपत्ती जप्त करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नव्या कायद्यानुसार, मुंबईतील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
केंद्र सरकारने अलीकडेच जारी केलेल्या ‘फरार आर्थिक गुन्हेगार कायद्याच्या’च्या आधारे ईडीने हा अर्ज केला आहे. यानुसार, फरार आरोपीची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार कायदेपालन संस्थांना मिळाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने हा अध्यादेश आणला आहे.
ईडीच्या अर्जात मल्ल्याच्या सर्व मालमत्ता जप्त करण्याचा उल्लेख केला आहे. मल्ल्याला अप्रत्यक्षरीत्या ताब्यात ठेवलेल्या मालमत्तांचाही त्यात समावेश आहे. ईडीच्या अर्जात म्हटले आहे की, जप्ती प्रस्तावित करण्यात आलेल्या मल्ल्याच्या मालमत्तांचे एकूण मूल्य सुमारे १२,५00 कोटी रुपये आहे. त्यात स्थावर मालमत्ता आणि समभागांचा समावेश आहे.
आयडीबीआय आणि एसबीआय या दोन बँकांच्या नेतृत्वाखालील बँक समूहाच्या ९ हजार कोटी रुपयांच्या कर्जाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात हा अर्ज ईडीने दाखल केला आहे. ईडीने म्हटले की, मल्ल्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये दोन एफआयआर या आधीच दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार, त्याच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही जारी झाला आहे.
>नव्या कायद्यानुसार पहिलाच खटला
मोदी सरकारने जारी केलेल्या फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार दाखल करण्यात आलेला हा पहिलाच खटला आहे. या कायद्यानुसार लवकरच नीरव मोदी आणि मेहुल चोकसी विरोधातही खटला दाखल करण्यात येणार आहे. या दोघांनी पंजाब नॅशनल बँकेला १३,४00 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेला फसविले आहे.
मल्ल्याची १२,५00 कोटींची संपत्ती जप्त करणार
कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्याला नव्या कायद्यान्वये फरार घोषित करून, त्यांची १२,५00 कोटींची संपत्ती जप्त करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नव्या कायद्यानुसार, मुंबईतील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 03:48 AM2018-06-23T03:48:55+5:302018-06-23T03:49:07+5:30