लंडन : भारतीय बँकांचे सुमारे ९ हजार कोटी रुपये बुडवून ब्रिटनमध्ये दडून बसलेले कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्या याने आपण भारत सोडण्यापूर्वी वित्तमंत्री अरुण जेटली यांना भेटल्याचा दावा केला आहे. जेटली यांनी मात्र मल्ल्याचा दावा खोडून काढला आहे. मी मल्ल्याला २०१४ नंतर कधीही वेळ दिली नव्हती, असा खुलासा त्यांनी केला आहे. यावरून आता काँग्रेसने जेटलींवर टीका करीत, चौकशीची मागणी केली आहे.
मल्ल्याविरोधात भारत सरकारने दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी बुधवारी लंडनमधील वेस्टमिन्स्टर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सुरू झाली. यावेळी आयडीबीआय बँकेच्या थकीत कर्जावर युक्तिवाद झाला.
खोटी माहिती देऊन कर्ज घेतल्याचा भारत सरकारचा आरोप मल्ल्या यांच्या वकील क्लेअर माँटगोमेरी यांनी यावेळी फेटाळून लावला.
यावेळी मल्ल्या म्हणाला की, माझा राजकीय फुटबॉल झाला आहे. मी आणि माझी कंपनी ‘यूबीएचएल’ने २२ जून २0१८ रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात तडजोडीसाठी एक अर्ज सादर केला होता. कर्ज परतफेड करण्यासाठी १३,९00 कोटींच्या मालमत्ता विकण्याची परवानगी आम्ही त्यात मागितली होती. परंतु, त्यावर काहीच झाले नाही. मी जिनिवा येथे मुलाखत देण्यासाठी जाणार होतो. त्यापूर्वी वित्तमंत्री जेटली यांना भेटून मी बँकांसोबत तडजोड करण्यासंबंधी प्रस्ताव दिला होता. (वृत्तसंस्था)
>भारत सरकारचे आक्षेपही फेटाळले
कर्ज मिळविण्यासाठी खोटी माहिती देणे, रोख्यांची चुकीची किंमत सांगणे, कर्जाचा वापर दुसºयाच कारणांसाठी करणे व परतफेड न करण्याच्या उद्देशाने कर्ज घेणे, असे आरोप भारत सरकारने मल्ल्यावर ठेवले आहेत. मल्ल्याच्या वकिलांनी याला आक्षेप घेताना म्हटले की, विमान कंपनी यशस्वीरीत्या चालवून हे कर्ज घेतले असल्याने यात खोटेपणाचा मुद्दाच येत नाही.
प्रत्यार्पण झाल्यास मल्ल्याला मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात १२ क्रमांकाच्या कोठडीत ठेवले जाणार आहे. मल्ल्याच्या वकिलांनी तुरुंगातील सुविधांबाबत आक्षेप घेतले होते. या बराकीचा व्हिडिओ न्यायाधीशांनी तीन वेळा पाहिला आहे. तुरुंगाच्या स्थितीबाबत ते पुढील सुनावणीत भाष्य करण्याची शक्यता आहे.
मल्ल्या : भारत सोडण्यापूर्वी जेटलींना भेटलो वित्तमंत्री : मी मल्ल्याला वेळ दिलीच नव्हती
भारतीय बँकांचे सुमारे ९ हजार कोटी रुपये बुडवून ब्रिटनमध्ये दडून बसलेले कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्या याने आपण भारत सोडण्यापूर्वी वित्तमंत्री अरुण जेटली यांना भेटल्याचा दावा केला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 02:19 AM2018-09-13T02:19:11+5:302018-09-13T02:19:28+5:30