बीजिंग : चीनमधील ‘जिओनी’ या माेबाइल उत्पादक कंपनीने तब्बल २ काेटींहून अधिक स्मार्टफाेनमध्ये मालवेअर प्राेग्रॅम टाकून ग्राहकांची वैयक्तिक माहिती चाेरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या माहितीचा वापर
करून कंपनीने काेट्यवधींची कमाई केली आहे.
कंपनीने ‘स्टाेरी लाॅक स्क्रीन’ नावाच्या ॲपमध्ये ‘डार्क हाॅर्स’ नावाचा प्राेग्रॅम बेमालूमपणे टाकला हाेता. ग्राहकांची माहिती मिळवून ॲपमध्ये विशिष्ट जाहिराती दाखवून गैरमार्गाने सुमारे ३१ काेटी रुपयांचे उत्पन्न मिळविले.
हा प्रकार डिसेंबर २०१८ पासून सुमारे वर्षभर सुरू हाेता. या प्रकरणी चीनमधील न्यायालयाने चाैघांना तीन ते साडेतीन वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी २१ लाख रुपयांचा दंड ठाेठावला आहे.
दोन कोटींहून अधिक मोबाईल फोनमध्ये हे मालवेअर बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे.
स्मार्टफाेनमध्ये मालवेअर; चिनी कंपनीला दंड
कंपनीने ‘स्टाेरी लाॅक स्क्रीन’ नावाच्या ॲपमध्ये ‘डार्क हाॅर्स’ नावाचा प्राेग्रॅम बेमालूमपणे टाकला हाेता. ग्राहकांची माहिती मिळवून ॲपमध्ये विशिष्ट जाहिराती दाखवून गैरमार्गाने सुमारे ३१ काेटी रुपयांचे उत्पन्न मिळविले.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 05:55 AM2020-12-07T05:55:40+5:302020-12-07T05:56:02+5:30