Lokmat Money > बिझनेस न्यूज > २ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

Honasa Consumer Share Price: मामाअर्थची पॅरेंट कंपनी होनासा कन्झ्युमरच्या शेअरमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली. पाहा या मोठ्या घसरणीमागे नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 09:19 AM2024-11-20T09:19:00+5:302024-11-20T09:19:00+5:30

Honasa Consumer Share Price: मामाअर्थची पॅरेंट कंपनी होनासा कन्झ्युमरच्या शेअरमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली. पाहा या मोठ्या घसरणीमागे नेमकं कारण काय?

Mamaearth Honasa Consumer share plunges by 35 percent in 2 days investors huge loss know the reason | २ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

Honasa Consumer Share Price: मामाअर्थची (Mamaearth) पॅरेंट कंपनी होनासा कन्झ्युमरच्या शेअरमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली. मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात हा शेअर तब्बल १८ टक्क्यांनी घसरला. यासह त्याची किंमत ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच २४२.४ रुपयांवर पोहोचली. याआधी सोमवारी, १८ नोव्हेंबर रोजी होनासा कन्झ्युमरच्या शेअरमध्ये २० टक्क्यांची घसरण झाली होती. गेल्या दोन दिवसांत हा शेअर ३५ टक्क्यांनी घसरला आहे. होनासा कन्झ्युमरच्या सप्टेंबर तिमाहीच्या खराब निकालानंतर ही घसरण झाली आहे. जवळपास ५ तिमाहीनंतर कंपनीला पहिल्यांदाच तोटा सहन करावा लागला आहे. यामुळे बहुतांश बाजार विश्लेषकांनी शेअरच्या रेटिंग आणि टार्गेट प्राइसमध्ये कपात केली आहे.

मंगळवारी सकाळच्या सत्रात होनासा कन्झ्युमरचा शेअर ११ टक्क्यांनी घसरून २६३ रुपयांवर व्यवहार करत होता. ३२४ रुपयांच्या आयपीओ किमतीपेक्षाही ही खूपच कमी आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास ४० टक्क्यांची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे होनासा कन्झ्युमरचं बाजार भांडवलही १ अब्ज डॉलरच्या खाली आलंय.

होनासा कन्झ्युमरला सप्टेंबर तिमाहीत १९ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत २९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. या कालावधीत कंपनीचा महसूल ७ टक्क्यांनी घसरून ४६२ कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ४९६ कोटी रुपये होता. दरम्यान, कंपनीचा एकूण खर्च ९ टक्क्यांनी वाढून ५०६ कोटी रुपये झालाय.

घसरणीमागचं कारण काय?

या घसरणीमागचे मुख्य कारण कंपनीचा प्रोजेक्ट 'नीव' असल्याचं म्हटलं जात आहे. ज्याअंतर्गत कंपनीने डायरेक्ट-टू-कन्झ्युमर (डीटूसी) डिस्ट्रिब्युशन मॉडेलवर अधिक लक्ष केंद्रित केलं आणि यामुळे इन्व्हेंटरीमध्ये अॅडजस्टमेंट करावं लागलं.

या खराब निकालानंतर होनासा कन्झ्युमरला ब्रोकरेज कंपन्यांकडून रेटिंग डाउनग्रेडला सामोरे जावं लागलं. गोल्डमन सॅक्सने आपलं रेटिंग न्यूट्रल केलं आणि आपली टार्गेट प्राइस ५७० रुपयांवरून ३७५ रुपये केली. जेपी मॉर्गननंही शेअरचं रेटिंग कमी करून 'अंडरवेट' केलं आणि त्याची टार्गेट प्राइस ३३० रुपयांवर आणली. दरम्यान, केवळ जेफरीज आणि जेएम फायनान्शिअलनं आपलं बाय रेटिंग कायम ठेवलं आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Mamaearth Honasa Consumer share plunges by 35 percent in 2 days investors huge loss know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.