Join us  

ChatGPT नं केलं मालामाल; ३ महिन्यात युवकानं कमावले २८ लाख, कसं? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 11:50 AM

लान्स जंकच्या क्षमतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा बॉट सर्वांना उपलब्ध व्हावा अशी त्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले

नवी दिल्ली - ChatGPT ची चर्चा सध्या सगळीकडेच सुरु आहे. कदाचित तुम्ही हे नाव ऐकलंही असेल आणि वापरुनदेखील पाहिले असेल. परंतु यातून कमाईबद्दल विचार केला का? एका व्यक्तीने हा विचार केला आणि त्याच्या कमाईनं मालामाल झाला. ChatGPT चा वापर कसा केला जातो त्याबद्दल लोक सर्च करत आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर याविषयी कोर्सही उपलब्ध झाला आहे. 

ज्याठिकाणी लोक ChatGPT चा काम सोपे करण्यासाठी करत आहेत. तिथे या व्यक्तीने लोकांना याबद्दल सांगून लाखो रुपये कमवले आहेत. मागील वर्षीच्या अखेरीस Lance Junck ने ऑनलाईन कोर्स लॉन्च केला. हा कोर्स Udemy वर उपलब्ध आहे. ज्यात लोकांना ChatGPT चा वापर कसा केला जातो हे शिकवले जाते. Lance Junck च्या कोर्सला अवघ्या तीन महिन्यांत १५००० विद्यार्थ्यांनी रस दाखवला. रिपोर्टनुसार लान्सचा कोर्स ChatGPT Masterclass: A Complete ChatGPT Guide for Beginners चा नफा ३४,९१३ डॉलर (अंदाजे रु. २८.६ लाख) मिळवला आहे. ऑस्टिनमधील या व्यक्तीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चॅट जीपीटीचा वापर केला होता.

लान्स जंकच्या क्षमतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा बॉट सर्वांना उपलब्ध व्हावा अशी त्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले. ही एक संधी दिसली, जिथे तो ऑनलाइन कोर्सद्वारे लोकांना या टूलबद्दल सांगू शकतो. 'चॅटजीपीटीबद्दल शिकण्यास खूप वाव आहे असंही तो म्हणाला. त्याचसोबत लोक ChatGPT बद्दल घाबरतात, म्हणून मी ते शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीला तो बॉटसोबत तास घालवत होता. तो त्याला कादंबरीसाठी प्रस्तावना लिहायला सांगायचा किंवा एखाद्या उत्पादनाचे वर्णन लिहायचा. या सगळ्यातून तो बॉट कसा वापरायचा हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होता.

या कोर्समध्ये काय विशेष आहे?ChatGPT वर लान्स जंकचा कोर्स ७ तासांचा आहे. त्याची किंमत २० डॉलर आहे, ज्यामध्ये ५० लेक्चर समाविष्ट आहेत. ही सर्व लेक्चर तयार करण्यासाठी जंक यांना तीन आठवडे लागले. चॅटजीपीटी प्रॉम्प्ट कसे लिहायचे यापासून सुरुवात होते. यानंतर, व्यवसाय, विद्यार्थी आणि प्रोग्रामरसाठी विशिष्ट चॅटजीपीटी अॅप्लिकेशन्स सांगण्यात आले आहेत.