मुंबई: आजपासून देशात गोल्ड हॉलमार्किंगचा अनिवार्य असेल. त्यामुळे सोनं खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता ओळखता यावी यासाठी बीआयएस हॉलमार्किंग सक्तीचं करण्यात आलं आहे. या नियमाचा ढाचा दीड वर्षांपूर्वीच तयार करण्यात आला. मात्र कोरोना संकटामुळे तो लागू करण्यात आला नव्हता. आजपासून देशात त्याची अंमलबजावणी सुरू होईल.हर्षद मेहताचा 'स्कॅम' उघड करणाऱ्या सुचेता दलाल यांचं धक्कादायक ट्विट अन् शेअर बाजार गडगडला!
गोल्ड हॉलमार्किंग म्हणजे काय?गोल्ड हॉलमार्किंगमुळे सोन्याची दागिन्यांची शुद्धता ठरते. यापुढे सोने व्यावसायिकांना दागिन्यांची विक्री करताना बीआयएसचे मापदंड पूर्ण करावे लागतील. निकष पूर्ण केल्यावरच त्यांना हॉलमार्किंग मिळेल.
कोणत्या प्रकारच्या सोन्याला हॉलमार्किंग?सोन्याच्या शुद्धतेनुसार त्याचे विविध प्रकार पडतात. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या सोन्याला हॉलमार्किंग गरजेचं आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचं उत्तर १४ कॅरेट, १८ कॅरेट आणि २२ कॅरेट असं आहे.अदानींसाठी काळा दिवस! 6 पैकी 5 कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, लोअर सर्किटची वेळ
किती दंडाची तरतूद?नियमाचं उल्लंघन केल्यास बीआयएस कायदा २०१६ च्या २९ कलमाखाली कारवाई केली जाऊ शकते. उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला १ वर्षाचा कारावास आणि १ लाख रुपयाच्या दंडाची तरतूद आहे.
फसवणूक झाल्यास कुठे कराल तक्रार?दुकानदारानं तुमची फसवणूक केल्यास ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार करू शकता. ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी बीआयएसच्या मोबाईल ऍप किंवा तक्रार नोंदणी पोर्टलचा वापर करू शकता.
घरात असलेल्या सोन्याचं काय?ग्राहकांना घाबरण्याची गरज नाही. हॉलमार्किंगचा नियम सोन्याची विक्री करणाऱ्यांसाठी लागू असेल. ग्राहक त्यांच्याकडे असलेलं सोनं हॉलमार्कशिवाय विकू शकतात.