Lokmat Money > बिझनेस न्यूज > बल्क पॅकिंगच्या वस्तूंवर लेबलिंग होणार बंधनकारक; सरकारने २९ जुलैपर्यंत सूचना मागविल्या

बल्क पॅकिंगच्या वस्तूंवर लेबलिंग होणार बंधनकारक; सरकारने २९ जुलैपर्यंत सूचना मागविल्या

आतापर्यंत घाऊक पॅकिंगवर कमाल विक्री किंमत, वापर समाप्ती तारीख व उत्पादकांची माहिती देण्यापासून सूट दिली होती. ही उणीव दूर  करण्यासाठी नियमांत सुधारणा करण्यात येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 09:45 AM2024-07-16T09:45:54+5:302024-07-16T09:46:12+5:30

आतापर्यंत घाऊक पॅकिंगवर कमाल विक्री किंमत, वापर समाप्ती तारीख व उत्पादकांची माहिती देण्यापासून सूट दिली होती. ही उणीव दूर  करण्यासाठी नियमांत सुधारणा करण्यात येत आहे.

Mandatory labeling of bulk packing items The government has asked for suggestions by July 29 | बल्क पॅकिंगच्या वस्तूंवर लेबलिंग होणार बंधनकारक; सरकारने २९ जुलैपर्यंत सूचना मागविल्या

बल्क पॅकिंगच्या वस्तूंवर लेबलिंग होणार बंधनकारक; सरकारने २९ जुलैपर्यंत सूचना मागविल्या

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘वैधमापन नियम २०११’मध्ये सुधारणा करून २५ किलोपेक्षा अथवा २५ लिटरपेक्षा अधिक वजन व माप असलेल्या वस्तूंच्या वेष्टनावर वस्तूशी संबंधित सर्व माहिती देणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आणला आहे.

घाऊक विक्रीसाठीच्या वस्तूंच्या वेष्टनावर उत्पादक, पॅकर व आयातदार यांची नावे व पत्ता टाकावा लागेल. उत्पादनाचा देश, वस्तूचे नाव, वजन-माप, उत्पादन महिना वर्ष, एमआरपी, विक्री मूल्य, वापराची तारीख इत्यादी विवरणही वेष्टनावर द्यावे लागेल. यावर नागरिकांना २९ जुलैपर्यंत सूचना व हरकती नाेंदवता येतील.

ही सूट आता नसेल?

आतापर्यंत घाऊक पॅकिंगवर कमाल विक्री किंमत, वापर समाप्ती तारीख व उत्पादकांची माहिती देण्यापासून सूट दिली होती. ही उणीव दूर  करण्यासाठी नियमांत सुधारणा करण्यात येत आहे. ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही प्लॅटफार्मसाठी हा नियम बंधनकारक असेल.

Web Title: Mandatory labeling of bulk packing items The government has asked for suggestions by July 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.