नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘वैधमापन नियम २०११’मध्ये सुधारणा करून २५ किलोपेक्षा अथवा २५ लिटरपेक्षा अधिक वजन व माप असलेल्या वस्तूंच्या वेष्टनावर वस्तूशी संबंधित सर्व माहिती देणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आणला आहे.
घाऊक विक्रीसाठीच्या वस्तूंच्या वेष्टनावर उत्पादक, पॅकर व आयातदार यांची नावे व पत्ता टाकावा लागेल. उत्पादनाचा देश, वस्तूचे नाव, वजन-माप, उत्पादन महिना वर्ष, एमआरपी, विक्री मूल्य, वापराची तारीख इत्यादी विवरणही वेष्टनावर द्यावे लागेल. यावर नागरिकांना २९ जुलैपर्यंत सूचना व हरकती नाेंदवता येतील.
ही सूट आता नसेल?
आतापर्यंत घाऊक पॅकिंगवर कमाल विक्री किंमत, वापर समाप्ती तारीख व उत्पादकांची माहिती देण्यापासून सूट दिली होती. ही उणीव दूर करण्यासाठी नियमांत सुधारणा करण्यात येत आहे. ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही प्लॅटफार्मसाठी हा नियम बंधनकारक असेल.