मणिपूरमध्ये या महिन्याच्या सुरुवातीपासून हिंसाचार सुरू झाला आहे. यामुळे मणिपूरमध्ये मोठा संकट सुरू आहे. या परिणाम आता राज्याबाहेरील वस्तूंच्या आयातीवर झाला असून, त्यामुळे राज्यामध्ये जीवनावश्यक वस्तू दुप्पट दराने मिळत आहेत. मणिपूरच्या बहुतांश भागात सिलिंडर, पेट्रोल, तांदूळ, बटाटे, कांदे आणि अंडी यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची निश्चित किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत आहे.
“उद्घाटन राष्ट्रपतींनीच करावे”; नवीन संसद भवनाचा वाद सुप्रीम कोर्टात, जनहित याचिका दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, “पूर्वी ५० किलो तांदूळ ९०० रुपयांना मिळत होते, पण आता तेच तांदुळ १८०० रुपयांना मिळत आहे. बटाटा आणि कांद्याच्या दरातही २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे. राज्याबाहेरून आणलेल्या प्रत्येक वस्तूची किंमत वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
गॅस सिलिंडचे रेटही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काळ्या बाजारात गॅस सिलिंडर १८०० रुपयांना मिळत आहे तर अनेक भागात पेट्रोलची किंमत १७० रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचले आहे.तर दुसरीकडे खाण्याच्या वस्तुंच्या किंमतीही वाढल्या आहेत. ३० अंड्यांचा एक क्रेट १८० रुपयांना मिळत होता, मात्र आता ३०० रुपयांना मिळत आहे. जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या ट्रकवर सुरक्षा दलांनी लक्ष ठेवले आहे. सुरक्षा दलाच्या आगमनापूर्वी बटाट्याचे भाव १०० रुपये किलोवर गेले होते.
मणिपूरमधील ज्या जिल्ह्यांना हिंसाचाराचा फटका बसला नाही, तेथे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत फारसा फरक पडलेला नाही. तामेंगलाँग जिल्ह्यात रेशन दुकान चालवणाऱ्या रेबेका गंगमेई म्हणाल्या, “आवश्यक वस्तूंच्या, विशेषतः तांदळाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तर आमच्या जिल्ह्यात हिंसाचार झाला नाही. मांसाच्या किमतीत कोणताही बदल दिसून आला नाही, कारण ते इतर राज्यांतून आयात केले जात नाही आणि स्थानिक लोकांकडूनच खरेदी केले जाते.