Join us

कंडोम बनविणाऱ्या कंपनीचा आयपीओ हाऊसफुल्ल! एवढा की गुंतवणूकदारांचे माहिती नाही, मालक मालामाल होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 9:33 PM

मॅनकाइंड फार्माचा आयपीओ हा ऑफर फॉर सेल होता. या इश्यूमध्ये, प्रवर्तक आणि इतर विद्यमान भागधारकांनी कंपनीचे 40,058,844 इक्विटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले होते.

कंडोम बनविणारी कंपनीने पैसे कमविण्याची संधी आणली आहे. मॅनकाईंड फार्माच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी हातोहात सबस्क्राईब केले आहे. आजच्या शेवटच्या दिवशी या कंपनीचा आयपीओ 15.32 पटींनी ओव्हर सबस्क्राईब झाला आहे. हा आयपीओ २५ एप्रिलला सुरु झाला होता. 

IPO मध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा (QIBs) हिस्सा 4916 टक्के झाला आहे. मात्र या आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांचा (आरआयआय) म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळालेला नाहीय. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (NII) हिस्सा 380 टक्के झाला आहे. आता या आयपीओचे सबस्क्रीप्शन बंद झाले आहे. 

दुसरी विचारात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ओवरसब्सक्राइब होऊनही गुरुवारी मॅनकाईंड फार्माचा शेअरचा जीएमपी पडला आहे. सोमवारच्या ९२ रुपयांच्या तुलनेत हा ३० रुपये झाला आहे. ग्रे मार्केट प्रीमियममध्ये या शेअरची किंमत २.७८ टक्क्यांनी जास्त मिळण्याची शक्यता आहे. मॅनकाईंडने या शेअरचा प्राईस बँड 1026 ते 1080 रुपये प्रति शेयर ठेवला आहे. या शेअरची फेस व्हॅल्यू १ रुपया आहे. या प्राईस बँडद्वारे कंपनीला 4,326.35 कोटी रुपये गोळा करायचे आहेत. 

मॅनकाइंड फार्माचा आयपीओ हा ऑफर फॉर सेल होता. या इश्यूमध्ये, प्रवर्तक आणि इतर विद्यमान भागधारकांनी कंपनीचे 40,058,844 इक्विटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले होते. यामध्ये मेश जुनेजा, राजीव जुनेजा आणि शीतल अरोरा यांनी शेअर विकले. याशिवाय, केर्नहिल सीआयपीईएफ, केर्नहिल सीजीपीई, बेझ लिमिटेड आणि लिंक इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट देखील शेअर विकत आहेत.  

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार