नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुुरुवारी सभागृहात जीएसटी विधेयकाला जोरदार समर्थन केल्याचे दिसून आले. जीएसटीवर राज्यसभेत संशोधन प्रस्ताव सादर करणारे काँग्रेसचे सदस्य जयराम रमेश यांनी स्पष्ट केले की, ते याबाबत आग्रही नाहीत. मनमोहन सिंग यांचा या विधेयकाबाबत सर्वसहमतीचा दृष्टीकोन असल्याचेही जयराम रमेश यांनी सांगितले. जीएसटीशी संबंधित चार विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली हे मनमोहन सिंग यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याशी हात मिळविले. हे विधेयक मंजूर झाल्याबद्दल मनमोहन सिंग यांनी भाजप सदस्यांचे अभिनंदन केले.
मनमोहन सिंग यांचे जीएसटीला समर्थन
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुुरुवारी सभागृहात जीएसटी विधेयकाला जोरदार समर्थन केल्याचे दिसून आले.
By admin | Published: April 7, 2017 11:53 PM2017-04-07T23:53:07+5:302017-04-07T23:53:07+5:30