नवी दिल्ली- बँकेचे व्यवहार करताना जास्त करून चेक(धनादेश)शी संबंध येतो. बऱ्याचदा चेकच्या माध्यमातून व्यवहार करण्याला ग्राहक प्राधान्य देत असतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का, कॅन्सल चेकही बऱ्याच ठिकाणी कामाला येतो. खरं तर चेकवर दोन आडव्या लाइन मारल्यानंतर त्यामध्ये कॅन्सल असं लिहिलं जातं. त्याला कॅन्सल चेक म्हणतात. अशा चेकचा दुरुपयोग होण्याची शक्यता फार कमी असते. असं नाही की कॅन्सल चेक कुठेही कामाला येत नाही. तर कॅन्सल चेकचा तुम्ही बऱ्याच ठिकाणी वापर करू शकता. चेकवर खातेधारकाचं नाव, बँकेचं खाते क्रमांक, आयएफएससी कोड, बँक आणि शाखेच्या नावासह इतरही माहिती दिलेली असते. कॅन्सल चेकवरही ही सर्व माहिती असते. तसेच इतर आर्थिक कामांमध्येही कॅन्सल चेक फायदेशीर ठरतो.
- वीमा आणि बँक अकाऊंटसाठी- जर तुम्ही वीमा संरक्षण मिळवू इच्छिता, तर तुम्हाला इतर दस्तावेजासह कॅन्सल चेकही द्यावा लागतो. वीम्याशिवाय दुसरं बँक अकाऊंट उघडण्यासाठीही कॅन्सल चेक फायदेशीर ठरतो. नव्या बँक अकाऊंट उघडण्यासाठी आधी असलेल्या अकाऊंटचा कॅन्सल चेक द्यावा लागतो.
- डीमॅट अकाऊंट- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट अकाऊंटची गरज असते. डीमॅट अकाऊंटशिवाय तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवू शकत नाही. परंतु डीमॅट अकाऊंट ओपन करण्यासाठी आयडी प्रूफ, अकाऊंट ओपनिंग फॉर्मसह तुम्हाला कॅन्सल चेकही ब्रोकरला द्यावा लागतो. तेव्हाच तुम्ही डीमॅट अकाऊंट उघडू शकता.
- केवायसी आणि ईएमआयसाठी देऊ शकता कॅन्सल चेक- जर तुम्हाला हप्त्यांवर कर्ज घ्यायचं असल्यास बँकेचा कॅन्सल चेक द्यावा लागतो. या कॅन्सल चेकवरच्या माहितीच्या आधारेच दर महिन्याला तुमच्या कर्जावर हप्ता घेतला जातो. कॅन्सल चेकच्या माध्यमातून तुम्ही केवायसीही करू शकता. कॅन्सल चेक तुमच्या खात्यासंदर्भातील सर्व माहिती देतो. त्यासाठी कॅन्सल चेक द्यावा लागतो.
- पीएफची रक्कम काढण्यासाठी- सरकारी आणि खासगी नोकरी करणा-या नोकरदारांच्या पगारातील काही भाग हा प्रॉव्हिडंट फंडात जमा होतो. जर तुम्हाला हा प्रॉव्हिडंट फंड काढायचा असल्यास तुम्ही कॅन्सल चेकचा वापर करू शकता.