Join us  

Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 10:35 AM

जसा तंत्रज्ञानाचा फायदा आहे, तसा त्याचा तोटाही आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन अनेकदा सायबर गुन्हेगारांनी लोकांची मोठी फसवणूक केल्याच्या अनेक घटना घडत आहेत.

जसा तंत्रज्ञानाचा फायदा आहे, तसा त्याचा तोटाही आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन अनेकदा सायबर गुन्हेगारांनी लोकांची मोठी फसवणूक केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. दरम्यान, आता आणखी एक मोठी माहिती समोर आलीये. सायबर फ्रॉड संशयित गेमिंग अॅप्सचा प्रचार करण्यासाठी मुकेश अंबानी आणि विराट कोहली सारख्या सेलिब्रिटींचे दररोज १,००० हून अधिक फेक डोमेन आणि डीपफेक व्हिडिओ तयार करत आहेत, अशी माहिती सायबर सिक्युरिटी फर्म क्लाउडसेकने शुक्रवारी दिली. 

क्लाऊडसेकच्या एका अहवालानुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करून तयार केलेले बनावट व्हिडीओ तयार करून संशयास्पद अॅप्सना सपोर्ट केलं जात आहे. नामवंत व्यक्तींचे फेक न्यूज व्हिडिओ बनवले जातात. यासाठी प्रसिद्ध टेलिव्हिजन अँकर्सच्या फुटेजमध्ये फेरफारही केला जातो, असं यातून समोर आलंय.

दररोज हजारो डोमेन

सायबर गुन्हेगार लोकांना संशयास्पद अॅप्स डाऊनलोड करण्याचं आमिष दाखवतात. यासाठी ते डीपफेक व्हिडीओंचा वापर करत आहेत. वास्तविक दिसण्यासाठी ते बनावट प्ले स्टोअरदेखील तयार करत असल्याचं या रिपोर्टमधून समोर आलंय. याशिवाय सातपेक्षा अधिक देशांतील लोकांना फसवण्यासाठी दररोज १००० पेक्षा जास्त बनावट डोमेन तयार केले जात आहेत. 

डीपफेक-डिटेक्शन तंत्रज्ञानाचा फायदा घेत त्यांच्या रिसर्च टीमनं भारत, पाकिस्तान, नायजेरिया, सौदी अरेबिया आणि इतर देशांमध्ये बनावट गेमिंग अॅप्सचा प्रचार करणाऱ्या फसव्या मोहिमांची ओळख पटवली असल्याचं सायबर सिक्युरिटी फर्मनं म्हटलंय.

अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक

मुकेश अंबानी, विराट कोहली, अनंत अंबानी, नीरज चोप्रा, ख्रिस्तियानो रोनाल्डो, जेम्स डोनाल्डसन (एमआरबीस्ट) आणि डेडपूल उर्फ रायन रेनॉल्ड्स यांसारखे सेलिब्रिटी आंतरराष्ट्रीय अॅपची जाहिरात करताना दिसले आहेत. कमीत कमी गुंतवणुकीतून मोठी आर्थिक बक्षिसं देण्याचं आमिष देऊन या सेलिब्रिटींचे व्हिडीओ युझर्सना आकर्षित करतात आणि गेम खेळून त्यांचे पैसे वाढवण्याचा दावा करतात. या व्हिडिओंची सुरुवात अनेकदा प्रतिष्ठित न्यूज अँकर्सच्या फेरफार केलेल्या फुटेजपासून होते. या फेक ब्रॉडकास्टमध्ये, हे अॅप सर्वच लोकांना सहज पैसे कमावण्यास मदत करत असल्याचा दावा करण्यात आलाय. क्लाउडसेकनं आपले डीपफेक व्हिडीओ डिटेक्शन तंत्रज्ञान सर्वांसाठी मोफत करण्याची घोषणा केली. यामुळे लोकांना डीपफेक व्हिडिओ ओळखण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :सायबर क्राइमविराट कोहलीमुकेश अंबानी