Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनेक कंपन्यांकडून पगारकपात मागे, बोनसही देणार

अनेक कंपन्यांकडून पगारकपात मागे, बोनसही देणार

bonuses : गेल्याच आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजने हायड्रोकार्बन व्यवसायातील कर्मचाऱ्यांची पगारकपात मागे घेतली आहे. यासोबतच चल वेतनही अदा केले आहे. तसेच एकूण चल वेतनापैकी ३० टक्के आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 01:56 AM2020-11-06T01:56:43+5:302020-11-06T06:17:21+5:30

bonuses : गेल्याच आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजने हायड्रोकार्बन व्यवसायातील कर्मचाऱ्यांची पगारकपात मागे घेतली आहे. यासोबतच चल वेतनही अदा केले आहे. तसेच एकूण चल वेतनापैकी ३० टक्के आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे.

Many companies will give back pay cut and bonuses | अनेक कंपन्यांकडून पगारकपात मागे, बोनसही देणार

अनेक कंपन्यांकडून पगारकपात मागे, बोनसही देणार

मुंबई : कोरोना महामारीमुळे डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सावरताना दिसत आहे. मरगळ झटकून नव्या जोमाने देश उभारी घेताना दिसत आहे. लोकांमध्येही विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, बाजारपेठेत उत्साह दिसू लागला आहे. याचे सकारात्मक परिणाम होऊ लागले आहेत. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय नाइलाजाने करण्यात आलेली पगारकपात मागे घेऊन पगारवाढीचे चक्र अलीकडे आणल्याचे दिसत आहे. 
व्होल्टास आणि विजय सेल्स यासारख्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला आहे. तर अर्बन कंपनीने पगारवाढीचे चक्र अलीकडे आणले आहे. 
गेल्याच आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजने हायड्रोकार्बन व्यवसायातील कर्मचाऱ्यांची पगारकपात मागे घेतली आहे. यासोबतच चल वेतनही अदा केले आहे. तसेच एकूण चल वेतनापैकी ३० टक्के आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे.  कोटक महिंद्र बँकेनेही उच्च पदाधिकाऱ्यांची पगारकपात मागे घेतली आहे. हा निर्णय १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. तसेच दूरचित्रवाणी क्षेत्रातील कंपन्यांनीही असाच निर्णय घेतला आहे, तर काही कंपन्या दिवाळीपूर्वी ५० टक्के बोनसही कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. 

सणासुदीच्या दिवसांमध्ये दिलासा 
कोरोनाच्या संकटकाळात कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेऊन काम केले. ग्राहकांच्या सेवेसाठी कर्मचारी तत्पर होते. कर्मचाऱ्यांनीही संकटसमयी साथ सोडली नाही. त्यामुळे दिवाळीसारख्या मोठ्या सणासाठी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा दिला पाहिजे, अशी भूमिका अनेक कंपन्यांची आहे. तसेच अर्थव्यवस्थेतही सुधारणा दिसत आहे.

Web Title: Many companies will give back pay cut and bonuses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.