नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ७५ वर्षांहून अधिक वय असलेल्या निवृत्तीवेतनधारक ज्येष्ठ नागरिकांना प्राप्तिकर विवरण भरण्याची गरज नसल्याचे जाहीर केले हाेते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा निर्णय दिलासादायक वाटला हाेता. मात्र, प्रत्यक्षात या सवलतीमागे अनेक अटी असून अनेक मुद्द्यांवर स्पष्टीकरणाची गरज आहे.
निवृत्तीवेतन आणि व्याजाच्या स्वरूपातच ज्यांचे उत्पन्न आहे, अशा ७५ वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठांची प्राप्तिकर विवरण भरण्यापासून सुटका केली हाेती. त्यामुळे आता प्राप्तिकर भरावा लागणार नाही, असे काही जणांना वाटले हाेते. मात्र, तसे नाही. त्यांचे निवृत्तीवेतन आणि व्याजावर लागू असलेला कर बँकेद्वारेच वळता करण्यात येणार आहे. ज्येष्ठांना केवळ प्राप्तिकर विवरण भरण्याची गरज नाही. ही सवलत मिळविण्यासाठी पेन्शन आणि मुदत ठेव खाते एकाच बँकेत असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या बँकांमध्ये खाते असल्यास करकपातीसाठी इंटरकनेक्टिव्हिटीची गरज भासेल. सद्य:स्थितीत तरी ज्येष्ठांनी प्राप्तिकर विवरण दाखल करणेच याेग्य ठरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ज्येष्ठांना विवरणपत्र भरण्याच्या सवलतीत अनेक अटी, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
file returns : सद्य:स्थितीत तरी ज्येष्ठांनी प्राप्तिकर विवरण दाखल करणेच याेग्य ठरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 02:13 AM2021-02-15T02:13:55+5:302021-02-15T02:14:11+5:30