Join us

अनेक अर्थव्यवस्था पूर्वस्थितीत येण्यास लागेल विलंब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 5:22 AM

‘मूडीज’चा अंदाज, लसीकरणाचा वेग वाढल्याने सध्या मिळाला दिलासा

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काेराेना महामारीमुळे अर्थव्यवस्थेतील घसरण अल्पकालीन असेल. मात्र, २०२२ पर्यंत जगातील बहुतांश अर्थव्यवस्था महामारीच्या पूर्वस्थितीवर येणार नसल्याचा अंदाज ‘मूडीज’ने व्यक्त केला आहे. जागतिक आराेग्य संघटनेने गेल्यावर्षी ११ मार्चला काेराेना महामारी जाहीर केली हाेती. महामारीमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांवर नकारातमक परिणाम झाला आहे. 

लसीकरणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे यावर्षी महामारीची व्याप्ती आणि रुग्णसंख्या हळूहळू कमी हाेईल. त्यामुळे लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याबाबत सरकार विचार करतील. महामारीची तीव्रता कमी झाल्यानंतर आर्थिक सुधारणा गतीमान हाेतील, असा ‘मूडीज’चा अंदाज आहे. 

परतफेडीचे प्रमाण खूपच कमीयाबाबत ‘मूडीज’ने सादर केलेल्या एका जागतिक अहवालातून कर्जांचे वितरण व परतफेडीच्या घटलेले प्रमाणावर चिंता व्यक्त केली आहे. अजूनही निर्बंध असलेल्या क्षेत्रांवर धाेका जास्त असल्याचे ‘मूडीज’चे म्हणणे आहे. अर्थव्यवस्थांमध्ये सुधारणा दिसून येत आहे. मात्र, सुधारणा धीम्या गतीने हाेत आहे. त्यामुळे बहुतांश अर्थव्यवस्था २०२२ पर्यंत पूर्वपदावर येण्याची शक्यता नाही, असे ‘मूडीज’ने म्हटले आहे. 

टॅग्स :अर्थव्यवस्था