लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारताच्या सकळ देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) वृद्धीदरात झालेल्या घसरणीस जागतिक परिस्थिीतसह अनेक घटक जबाबदार आहेत, असा दावा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. नोटाबंदीमुळे वृद्धीदर घसरल्याचे त्यांनी अमान्य केले.
२0१६-१७ च्या चौथ्या तिमाहीत भारताचा वृद्धीदर घसरून ६.१ टक्क्यांवर आला आहे. तसेच २0१६-१७ या संपूर्ण वर्षात वृद्धीदर ७.१ टक्के राहिला आहे. हा गेल्या तीन वर्षांतील नीचांकी दर ठरला आहे. वृद्धीदरातील घसरणीला नोटाबंदी कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. त्यावरून सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जेटली यांनी म्हटले की, ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदी लागू करण्यात आली. त्याआधीच काही प्रमाणात मंदी दिसून येत होती. वास्तविक ७ ते ८ टक्के वृद्धी ही भारतीय मानकांनुसार व्यवहार्य, तर जागतिक मानकांनुसार अत्यंत चांगली आहे. मोदी सरकारला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जेटली ते बोलत होते. जेटली म्हणाले की, कुकर्जांवर तोडगा काढणे तसेच खाजगी गुंतवणुकीत वाढ करणे, ही सरकारसमोरील मुख्य आव्हाने आहेत. एअर इंडियाच्या खाजगीकरणाचा मुद्दा नागरी उड्डयण मंत्रालयाच्या अखत्यातिरत येतो, असे सांगून त्यांनी या विषयावर भाष्य करण्याचे टाळले. या प्रकरणी नीती आयोगाने आपल्या शिफारशी नागरी उड्डयण मंत्रालयाला दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नोटा मोजण्याचे काम सुरूच!
नोटाबंदीच्या काळात रिझर्व्ह बँकेला किती रकमेच्या जुन्या नोटा मिळाल्या या प्रश्नावर जेटली म्हणाले की, हिशेब काढण्याचे काम सुरू आहे. रिझर्व्ह बँक ही जबाबदार संस्था आहे.
अंदाजपंचे आकडा देऊ शकत नाही. प्रत्येक नोट मोजावी लागणार आहे. बनावट नोटा बाजूला काढून खऱ्या नोटा मोजाव्या लागतील. हे काम मोठे आहे. ते पूर्ण होताच आकडा जाहीर केला जाईल.
जीडीपीचा दर घसरण्यास अनेक घटक कारणीभूत
भारताच्या सकळ देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) वृद्धीदरात झालेल्या घसरणीस जागतिक परिस्थिीतसह अनेक घटक जबाबदार आहेत, असा
By admin | Published: June 2, 2017 01:35 AM2017-06-02T01:35:23+5:302017-06-02T01:35:23+5:30