Lokmat Money > बिझनेस न्यूज > Vedant Fashions च्या शेअरनं गुंतवणुकदारांना केलं मालामाल; प्रति शेअर 'इतका' फायदा

Vedant Fashions च्या शेअरनं गुंतवणुकदारांना केलं मालामाल; प्रति शेअर 'इतका' फायदा

वेदांत फॅशन्सचा ब्रँड Manyavar खूप लोकप्रिय आहे. ब्रँडेड इंडियन वेडिंग आणि सेलिब्रेशन वेअर मार्केटमधला हा आघाडीचा ब्रँड आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 11:21 AM2022-02-16T11:21:58+5:302022-02-16T11:23:21+5:30

वेदांत फॅशन्सचा ब्रँड Manyavar खूप लोकप्रिय आहे. ब्रँडेड इंडियन वेडिंग आणि सेलिब्रेशन वेअर मार्केटमधला हा आघाडीचा ब्रँड आहे

Manyawar IPO: Vedant Fashions IPO Stock makes a decent debut lists with 8 percent premium | Vedant Fashions च्या शेअरनं गुंतवणुकदारांना केलं मालामाल; प्रति शेअर 'इतका' फायदा

Vedant Fashions च्या शेअरनं गुंतवणुकदारांना केलं मालामाल; प्रति शेअर 'इतका' फायदा

मुंबई – मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात चढउतार झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात भारतीय लग्नसराई आणि विविध कार्यक्रमासाठी वापरण्यात येणाऱ्या वेदांत फॅशन्सची शेअर बाजारात दमदार एन्ट्री झाली आहे. शेअर बाजारात कंपनीनं स्टॉक लिस्टिंगमध्ये ८ टक्के प्रिमियमसह ८६६ रुपये स्टॉक प्राइस जारी केले होते. तर BSE वर हा स्टॉक ९३६ रुपये दरावर लिस्ट झाला आहे. तर NSE वर ९३५ रुपये लिस्ट झाला आहे. त्यामुळे वेदांत फॅशन्सचे शेअर घेतलेल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर ७० रुपये फायदा झाला आहे.

वेदांत फॅशन्सच्या पहिल्या ऑफरला ४-८ फेब्रुवारी दरम्यान २.५७ पटीनं सब्सक्राइब मिळालं होतं. शेअर बाजारातील स्वास्तिका इन्वेस्टमेंट कंपनीचे रिसर्च हेड संतोष मीना म्हणाले की, वेदांत फॅशन्सची शेअर बाजारात सकारात्मक एन्ट्री झाली. संमिश्र प्रतिसाद असल्यानंतरही गुंतवणुकदारांना लिस्टिंग गेनचा फायदा झाला. कंपनीकडं अनेक दिग्गज ब्रॅंड आहेत. कंपनीची आर्थिक बाजूही सक्षम आहे. परंतु वॅल्यूएशन महागडं आहे. जर शेअरमध्ये सध्याच्या परिस्थितीत १५ ते २० टक्के घट झाली तर दिर्घकाळासाठी गुंतवणूकदार हा शेअर पोर्टफोलिओमध्ये ठेऊ शकतात.

Vedant Fashions च्या आयपीओमध्ये रिटेल इन्वेस्टर्ससाठी ३५ टक्के भाग राखीव ठेवला आहे. QIB म्हणजे क्वॉलिफाइड इन्स्टिटूयशनल इन्वेस्टर्ससाठी ५० टक्के भाग राखीव ठेवला होता. ते ७.४९ पटीनं भरला. कंपनीने पब्लिक इश्यूद्वारे ३ हजार १४९ कोटी रुपये उभे केले जे पूर्णपणे प्रवर्तक आणि गुंतवणूकदारांसाठी विक्रीसाठी ऑफर होते. त्यामुळे, कंपनीला इश्यूची रक्कम मिळाली नाही कारण आयपीओचे पैसे विक्री करणाऱ्या भागधारकांना मिळाले होते. ऑफरची किंमत ८२४-८६६ रुपये प्रति शेअर होती.

कंपनीबद्दल जाणून घ्या

वेदांत फॅशन्सचा ब्रँड Manyavar खूप लोकप्रिय आहे. ब्रँडेड इंडियन वेडिंग आणि सेलिब्रेशन वेअर मार्केटमधला हा आघाडीचा ब्रँड आहे. कंपनीकडे Twamev,Manthan, Mohey आणि Mebaz या नावाने ब्रँड देखील आहेत. ३० जून २०२१ पर्यंत, कंपनीकडे ५३७ विशेष ब्रँड आउटलेट्स (EBOs) सह किरकोळ नेटवर्क आहे, ज्यामध्ये जागतिक स्तरावर ५५ शॉप-इन-शॉप्सचा समावेश आहे. कंपनीचा अमेरिका, कॅनडा आणि UAE मध्येही चांगला व्यवसाय आहे. कंपनीचे लक्ष भारतातील टियर-II आणि टियर-III शहरांसह नवीन क्षेत्रांमध्ये प्रवेश करून तिचे किरकोळ नेटवर्क आणि उत्पादन पोहोच वाढवणे हे आहे.

Web Title: Manyawar IPO: Vedant Fashions IPO Stock makes a decent debut lists with 8 percent premium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.