Join us  

March End: या महिनाअखेरपर्यंत उरका कामे, अन्यथा १० हजार दंडास तयार रहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 8:01 AM

बँक आणि कर प्रणालीच्या डेडलाइन ३१ मार्चपर्यंतच 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सध्या मार्च महिना चालू असून, आर्थिक वर्षातील हा अखेरचा महिना आहे. या महिन्यामध्ये बँक आणि कर प्रणालीशी संबंधित अनेक डेडलाइन आहेत. या मुदतीपर्यंत तुम्ही विविध कर आणि बँकेशी संबंधित कामे केली नाहीत, तर तुम्हाला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. ३१ मार्चपर्यंत नेमक्या कोणत्या गोष्टींची मुदत संपत आहे याविषयी...

सुधारित प्राप्तिकर विवरणजर तुम्ही आर्थिक वर्ष २०२०-२१ चे प्राप्तिकर विवरण (इन्कम टॅक्स रिटर्न) भरले नसेल, तर तुम्ही ३१ मार्चपर्यंत सुधारित प्राप्तिकर विवरण (बिलेटेड रिटर्न) दाखल करू शकता. मात्र, आर्थिक कायदा २०१७ नुसार, सुधारित प्राप्तिकर विवरण दाखल करणे अतिशय महाग पडू शकते. या कायद्यानुसार, दिलेल्या मुदतीनंतर रिटर्न भरल्यास तुम्हाला विलंब शुल्क भरावे लागेल. प्राप्तिकर विवरण भरताना जर यात कोणती गोष्ट राहिली असेल तर ३१ मार्चपर्यंत ती दुरुस्त करू शकता.

आधार-पॅन कार्ड लिंकपॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. यापूर्वीही अनेकदा यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. जर तुम्ही ३१ मार्चपर्यंत तुमचे पॅन आधारशी लिंक केले नाही, तर ते निष्क्रिय होईल. निष्क्रिय पॅन वापरल्याबद्दल तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. ही समस्या टाळण्यासाठी आधार-पॅन लिंकिंग लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. 

कर वाचवण्यासाठी गुंतवणूकजर आपण आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये कर वाचवू इच्छित असाल तर आपल्याला ३१ मार्च २०२२ पर्यंत आपली गुंतवणूक पूर्ण करणे आवश्यक आहे. जर आपण असे केले नाही तर तुम्ही अधिकाधिक कर वाचवू शकत नाही.

आगाऊ कर जमा करणेजर एखाद्या करदात्याचे कर दायित्व १० हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर तो आगाऊ कर जमा करू शकतो. त्याची अंतिम मुदत १५ जून, १५ सप्टेंबर, १५ डिसेंबर आणि १२ मार्च असते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या कक्षेत येत असाल, तर तुम्ही १५ मार्चपर्यंत आगाऊ कर जमा करावा.

केवायसी अपडेट कराबँक खात्यात केवायसी अपडेट करणे हे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे काम आहे. त्याची अंतिम मुदत आधी ३१ मार्च २०२१ होती. मात्र, कोरोनामुळे बँक नियामक आरबीआयने बँक खात्यांची केवायसी अपडेट करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवली. तुम्ही तुमचे केवायसी ३१ मार्च २०२२ पर्यंत बँकेत अपडेट न केल्यास बँक तुमचे खाते गोठवू शकते.

टॅग्स :पॅन कार्डइन्कम टॅक्स