Lokmat Money > बिझनेस न्यूज > मार्च एन्ड... आज आयटीआर भरा, अन्यथा तुरुंगवास भोगा!

मार्च एन्ड... आज आयटीआर भरा, अन्यथा तुरुंगवास भोगा!

मुदतीत प्राप्तिकर विवरणपत्र भरणे बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 05:38 AM2022-03-31T05:38:57+5:302022-03-31T05:39:46+5:30

मुदतीत प्राप्तिकर विवरणपत्र भरणे बंधनकारक

March end ... fill ITR today, otherwise go to jail! | मार्च एन्ड... आज आयटीआर भरा, अन्यथा तुरुंगवास भोगा!

मार्च एन्ड... आज आयटीआर भरा, अन्यथा तुरुंगवास भोगा!

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : २०२०-२१ या वित्त वर्षाचे प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) ज्यांनी ३१ डिसेंबरपूर्वी दाखल केलेले नाही, त्यांच्यासाठी विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च आहे. या मुदतीत विवरणपत्र दाखल न केल्यास करदात्यास मोठा दंड भरावा लागू शकतो. इतकेच नव्हे, तर तुरुंगवासही होऊ शकतो.

‘टॅक्स मॅनेजमेंट डॉट इन’चे सीईओ दीपक जैन यांनी सांगितले की, विहित मुदतीत आयटीआर दाखल न केल्यास अघोषित संपत्तीसाठी करदात्यास नोटीस दिली जाऊ शकते. नोटीस मिळाल्यास करदात्यास दुहेरी फटका बसू शकतो. दंड तर भरावा लागेलच; पण व्याजही द्यावे लागेल. करदात्याकडे कर थकलेला असेल तर तुरुंगवास होऊ शकतो. कर तज्ज्ञ मनीतपाल सिंह यांनी सांगितले की, आयटीआर दाखल न करता कोणी कर चोरी केली असेल तर त्याच्यावर  ५० टक्के दंड लावला जाऊ शकतो. त्याचबरोबर पूर्ण कर आणि व्याजही द्यावेच लागेल. मुदतीनंतर आयटीआर दाखल केल्यास विलंब शुल्कही द्यावे लागेल. करपात्र उत्पन्न पाच लाखांपेक्षा अधिक असेल, तर पाच हजार रुपये विलंब शुल्क द्यावे लागेल.

भरू शकता सुधारित आयटीआर 
n२०२०-२१ या वित्त वर्षासाठी सुधारित आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे.
nसुधारित आयटीआर दाखल केल्यास करदात्यास विलंब शुल्क अथवा दंड भरावा लागत नाही.
nपहिल्या आयटीआरमधील चुकीमुळे कर देयता वाढली असेल तर प्राप्तिकर कायद्याच्या कलम २३४ अन्वये व्याज भरावे लागेल.
nकरदाता कर परताव्यासाठी पात्र असेल तर सुधारित आयटीआर दाखल झाल्यानंतरच कर परतावा मिळेल.
nआयटीआरमध्ये कितीही वेळा सुधारणा करता येते. मात्र, हे सर्व विहित मुदतीच्या आत करावे लागते.

Web Title: March end ... fill ITR today, otherwise go to jail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.