Lokmat Money > बिझनेस न्यूज > १,५०० कोटींचे शेअर्स विकले; पण कशासाठी?; महिनाभरात १७२ टक्क्यांनी वधारले भाव

१,५०० कोटींचे शेअर्स विकले; पण कशासाठी?; महिनाभरात १७२ टक्क्यांनी वधारले भाव

झुकेरबर्ग हे समभाग विक्रीद्वारे मिळणारा निधी उद्यम भांडवल, वैज्ञानिक संशोधन आणि प्रभावी गुंतवणूक यासाठी करणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 06:17 AM2023-12-06T06:17:35+5:302023-12-06T06:18:04+5:30

झुकेरबर्ग हे समभाग विक्रीद्वारे मिळणारा निधी उद्यम भांडवल, वैज्ञानिक संशोधन आणि प्रभावी गुंतवणूक यासाठी करणार आहेत.

Mark Zuckerberg has reportedly sold about 682,000 shares of Meta Company worth $185 million. | १,५०० कोटींचे शेअर्स विकले; पण कशासाठी?; महिनाभरात १७२ टक्क्यांनी वधारले भाव

१,५०० कोटींचे शेअर्स विकले; पण कशासाठी?; महिनाभरात १७२ टक्क्यांनी वधारले भाव

नवी दिल्ली : फेसबुक व इन्स्टाग्रामची पालक कंपनी ‘मेटा प्लॅटफॉर्म्स आयएनसी’चे सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी नोव्हेंबर २०२३मध्ये १८५ दशलक्ष डॉलर किमतीचे सुमारे ६,८२,००० समभाग विकल्याची माहिती समोर आली आहे.

कंपनीच्या दस्तऐवजात ही माहिती देण्यात आली. नोव्हेंबर २०२१नंतर झुकेरबर्ग यांनी पहिल्यांदाच आपले मेटामधील समभाग विकले आहेत. झुकेरबर्ग यांच्या ट्रस्टसाठी तसेच धर्मादाय आणि राजकीय देणग्यांसाठी काही संस्थांच्या माध्यमातून हे समभाग विकण्यात आले आहेत. यंदा नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत मेटाच्या समभागांच्या भावात १७२ टक्के वाढ झाली आहे. एनव्हिडिया कॉर्पसह सर्व प्रमुख अमेरिकी कंपन्यांना मेटाने मागे टाकले आहे. 

झुकेरबर्ग हे समभाग विक्रीद्वारे मिळणारा निधी उद्यम भांडवल, वैज्ञानिक संशोधन आणि प्रभावी गुंतवणूक यासाठी करणार आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच २०२२मध्ये त्यांनी एकही समभाग विकला नव्हता. गेल्या वर्षी कंपनीच्या समभागांची कामगिरीही वाईट राहिली होती. आता कंपनीचे समभाग पुन्हा एकदा २०२१च्या पातळीवर पोहोचत आहेत. झुकेरबर्ग यांच्याकडे मेटाची अजूनही १३ टक्के हिस्सेदारी आहे.

Web Title: Mark Zuckerberg has reportedly sold about 682,000 shares of Meta Company worth $185 million.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.