Lokmat Money > बिझनेस न्यूज > मार्केट A 2 Z भाग - १३: तळ गाठायला जाल तर असे गाळात रुताल...

मार्केट A 2 Z भाग - १३: तळ गाठायला जाल तर असे गाळात रुताल...

बाजारात अनेक शेअर्सचे भाव खाली येत असतात. उत्तम संधी किव्वा ऍव्हरेजींग करण्यासाठी गुंतवणूकर यात अधिक रक्कम गुंतवीत जातात. परंतु...

By पुष्कर कुलकर्णी | Published: December 26, 2022 10:28 AM2022-12-26T10:28:10+5:302022-12-26T10:29:37+5:30

बाजारात अनेक शेअर्सचे भाव खाली येत असतात. उत्तम संधी किव्वा ऍव्हरेजींग करण्यासाठी गुंतवणूकर यात अधिक रक्कम गुंतवीत जातात. परंतु...

market a 2 z know about companies in share market starting alphabet n and if you go to the bottom you will be stuck in mud | मार्केट A 2 Z भाग - १३: तळ गाठायला जाल तर असे गाळात रुताल...

मार्केट A 2 Z भाग - १३: तळ गाठायला जाल तर असे गाळात रुताल...

- पुष्कर कुलकर्णी 
pushkar.kulkarni@lokmat.com
Follow: www.lokmat.com/author/pushkarkulkarni

N: Never do fishing at bottom 

बाजारात अनेक शेअर्सचे भाव खाली येत असतात. उत्तम संधी किव्वा ऍव्हरेजींग करण्यासाठी गुंतवणूकर यात अधिक रक्कम गुंतवीत जातात. परंतु असे करताना शेअरचे भाव का खाली येत आहेत याची नेमकी कारणे शोधणे आवश्यक असते. यासाठी फंडामेंटल्स टूल्स उपयुक्त असतात. तिमाही, सहामाही आणि वार्षिक कालावधीसाठी या टूल्स मधून अवश्य पाहाव्यात अशा  गोष्टी म्हणजे कंपनीचे एकूण उत्पन्न, नेट प्रॉफिट, नेट प्रॉफिट मार्जिन, डेब इक्विवी रेशो इत्यादी. जर सातत्याने यात घट होत असेल तर गुंतवणूकदारांनी सावध राहून अधिक रक्कम गुंतवून धोका पत्करू नये. 

उदाहरणे सांगता येतील अशा कंपन्या म्हणजे, वोडा - आयडिया, सुझलॉन, युनिटेक, आर कॉम या कंपन्यांचे शेअर्स चे भाव गेल्या १० वर्षांत कसे खाली आले ते पाहावे. इंग्रजी मध्ये फिशिंग ऍट बॉटम अशी म्हण आहे. याचाच अर्थ तळ गाठता गाठता खरेदी करत करत आपणच त्यात रुतून बसू नये याची गुंतवणूकदारांनी काळजी अवश्य घ्यावी. कंपनीचा व्यवसाय पाहावा आणि त्यातील भविष्यातील संधी किती हेही पाहावे. आज इंग्रजी अक्षर N पासून सुरु होणाऱ्या काही चांगल्या कंपन्यांविषयी..

- नवीन फ्लोराईन इंटरनॅशनल लि.  (NAVINFLOUR) - स्पेशालिटी फ्लोराईन केमिकल मध्ये कंपनीचा व्यवसाय भारतात आणि इतर देशांत कार्यरत आहे. रेफ्रिजरेशन साठी मॅफ्रॉन या ब्रँड नावाने कंपनी गॅस तयार करून त्याची विक्री हा कंपनीचा प्रमुख व्यवसाय आहे.

फेस व्हॅल्यू - रुपये २/- प्रति शेअर
सध्याचा भाव ; रु. ४०८६/- प्रति शेअर
मार्केट कॅप - रु २० हजार ५०० कोटी
भाव पातळी  - वार्षिक हाय रु ४८४८ /- आणि  लो रु ३३६०/-
बोनस शेअर्स - अद्याप दिले नाहीत
शेअर स्प्लिट -  सन २०१७ मध्ये १:५ या प्रमाणात
डिव्हिडंड - भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो. मागील डिव्हिडंड रक्कम रु. ६/- प्रति शेअर
रिटर्न्स - गेल्या १० वर्षांत तब्बल ६६ पटीने रिटर्न्स मिळाले आहेत.
भविष्यात संधी - उत्तम. केमिकल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्स मध्ये मोठ्या फरकाने चढ उतार होत असतो. परंतु दीर्घकालीन चार्ट पॅटर्न उत्तम असतो. कंपनीचा व्यवसाय उत्तम असून कुलिंग आणि रेफ्रिजरेशन मध्ये गॅस अत्यंत गरजेचा घटक असल्याने दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

- नेस्ले इंडिया लि (NESTLEIND) - नेस कॉफी, मॅगी, किटकॅट इत्यादी ब्रॅण्ड्स आपण पहिले असतीलच आणि खरेदीही केले असतील. प्रोसेस फूड क्षेत्रातील भारतातील एक नामांकित आणि अग्रगण्य कंपनी, प्रयेक घरात किव्वा कुटुंबातील अनेक सदस्य नेस्लेचे एखादे तरी उत्पादन घेत असतातच. 
 
फेस व्हॅल्यू - रु १०/- प्रति शेअर
सध्याचा भाव ; रु २०,१३२/- प्रति शेअर
मार्केट कॅप - रुपये  १ लाख ९५ हजार कोटी
भाव पातळी  - वार्षिक हाय रु २१०५०/- आणि  लो -रु १६००० /-
बोनस शेअर्स - सन १९८६ ते ९६ या दरम्यान पाच वेळा बोनस दिले आहेत. त्यानंतर नाही.
शेअर स्प्लिट - अद्याप नाही
रिटर्न्स - गेल्या दहा वर्षांत सुमारे चार पट रिटर्न्स दिले आहेत.
डिव्हिडंड - भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.मागील बोनस रु १२० प्रती शेअर इतका होता.
भविष्यात संधी - उत्तमच. बाजारात अनेक स्पर्धक असताना नेस्लेला त्यांच्या तोडीची टक्कर देण्यात कोणत्याही कंपनीला यश प्राप्त झालेले नाही. कंपनी आपल्या उत्पादनात नावीन्य आणते. तसेच नवीन उत्पादनांसाठी रिसर्च सुरु असतो. या मुळे दीर्घ कालीन गुंतवणुकीसाठी एक चांगली कंपनी.

- निप्पोन निफ्टी बीज  (NIFTYBEES)- ज्यांना थेट शेअर मध्ये रक्कम गुंतवायची नाही त्यांच्यासाठी एक्सचेन्ज ट्रेड फंड्स द्वारे गुंतवणूक करता येते. असेट मॅनेजमेंट कंपनी तर्फे  निफ्टी बीज चे शेअर घेऊन गुंतवणूक करण्याची सुविधा नॅशनल स्टॉक एक्सचेन्ज तर्फे करण्यात आली आहे. इतर शेअर प्रमाणेच निफ्टी बीज चे युनिट्स चालू भावात खरेदी विक्री करता येतात. निफ्टी ५० इंडेक्स  जसा वर खाली होतो त्यानुसार याचा भावही वर खाली होतो.
फेस व्हॅल्यू - रुपये १०/-
सध्याचा भाव ; रु  १९५/-
भाव पातळी  - वार्षिक हाय रु २२३ /- आणि  लो - १५३/-
रिटर्न्स -  निफ्टी ५० इंडेक्स प्रमाणे रिटर्न्स मिळतात म्हणजे निफ्टी वाढला तर आपल्या युनिटचा भाव त्यानुसार वाढतो.
भविष्यात संधी - दीर्घ कालीन विचार करता यातील गुंतवणूक अत्यंत सुरक्षित मनाली जाते. प्रत्येक महिन्यास एस आय पी प्रमाणे गुंतवणूक करावी. पुढील पाच दहा वर्षांत निफ्टी ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणात नफा होईल, तसेच आवश्यक वाटल्यास केव्हाही गुंतवणूक काढता येते.

N - इतर गुंतवणुकीच्या संधी - निफ्टी बीज प्रमाणे निफ्टी आयटी, निफ्टी इन्फ्रा, निफ्टी बँक, निफ्टी कंझ्यूमेबल असे इतर एक्सशेंज ट्रेड फंड्स आहेत. या मध्ये गुंतवणूक करू शकता.

टीप: हे सदर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक असून कंपनीच्या भविष्यातील आर्थिक कामगिरीची कोणतीही हमी देत नाही.

पुढील भागात 'O' या अक्षराने सुरु होणाऱ्या कंपन्यांविषयी ...

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: market a 2 z know about companies in share market starting alphabet n and if you go to the bottom you will be stuck in mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.