पुष्कर कुलकर्णी
पैशांचे काम पैसाच करतो असे म्हणतात. खरे आहे ते. शेअर बाजारात जे वर्षानुवर्षे आहेत, ज्यांनी अनेक चांगल्या कंपन्यांमध्ये अनेक वर्षांपासून रक्कम गुंतविली आहे ते हे ठामपणे सांगू शकतात की पैसाच वाढवीत असतो पैसा, अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गेल्या पंधरा वीस पंचवीस वर्षात शंभर पटींपेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत. म्हणजेच एक हजार गुंतविले आणि त्याचे आज एक लाखांच्या वर झाले. त्यात डिव्हिडंड रक्कम मिळाली असेल तर ती चेरी ऑन द केक असेच म्हणावे लागेल. यातून जो 'अर्थबोध होतो तो म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूकदार खरोखरच खोऱ्याने पैसे ओढत असतात. म्हणूनच म्हणतात की, Money brings Money. आज इंग्रजी एम या अक्षरापासून सुरु होणाऱ्या काही चांगल्या कंपन्यांविषयी...
महिंद्रा अँड महिंद्रा लि. (M&M)
वाहन उद्योग क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी, कार, दुचाकी, कमर्शियल वाहने उत्पादन आणि विक्री हा प्रमुख व्यवसाय, आधीच मंदीच्या फेयात असलेल्या आणि नंतर कोरोना काळात अजून दबलेला वाहन उद्योग आता सावरू लागला आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत महिंद्राने आपली कंबर कसली आहे.
फेस व्हॅल्यू रु. ५/- प्रतिशेअर
सध्याचा भाव रु. १२५१/- प्रतिशेअर
मार्केट कॅप : रु. १ लाख ५६ हजार कोटी
भाव पातळीः वार्षिक हाथ रु. २३६६/- लो रु.६७१/-
बोनस शेअर्सः सन १९८० ते २०१७ या काळात पाच वेळा दिले आहेत.
शेअर स्प्लिट सन २०१० मध्ये १२ वा प्रमाणात डिव्हिडंड भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
रिटर्न्स : गेल्या १० वर्षांत तिप्पट परतावा दिला आहे.
भविष्यात संधीः वाहन क्षेत्र कधी मंदी तर कधी तेजीत असते. भविष्यात इलेक्ट्रिक वाहन विक्री वाढणार असून ही कंपनी बात कार्यरत आहे. यामुळे कंपनीस भविष्यात चांगले दिवस असतील. सध्याचा शेअरचा भाव येणाऱ्या काळात थोडा करेक्ट होऊ शकतो.
एम्फसिस लि. (MPHASIS)
आयटी क्षेत्रात कार्यरत असलेली ही कंपनी बँकिंग, इंश्युरन्स, टेलिकॉम आणि लॉजिस्टिक या क्षेत्रातील कंपन्यांना क्लाउड सर्विस प्रदान करते. याचबरोबर प्रॉडक्ट इंजिनीअरिंग, ऑटोमेशन आणि सायबर सेक्युरिटीमध्येही सेवा प्रदान करते.
फेस व्हॅल्यू रु. १०/- प्रतिशेअर
सध्याचा भाव रु. १९९३/- प्रतिशेअर
मार्केट कॅपः रु. ३६ हजार कोटी
भाव पातळीः वार्षिक हाय रु. ३४७९/- आणि लो रु. १८९८/-
बोनस शेअर्सः सन २००३ ते २००५ दरम्यान तीन वेळा दिले आहेत.
शेअर स्प्लिटः अद्याप नाही.
रिटर्न्स : गेल्या दहा वर्षांत सहा पट रिटर्न्स दिले आहेत.
डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
भविष्यात संधीः उत्तम राहील.
कंपनीचे कार्य कोर आयटी क्षेत्रात असून यास भविष्यात उत्तम दिवस असतील, शेअर स्प्लिटची संधी आहेच.
मॅरिको लि. (MARICO)
एफएमसीजीमधील पर्सनल केअर क्षेत्रात विशेषतः केसांशी निगडित आणि आरोग्याशी निगडित उत्पादन आणि विक्री हा प्रमुख व्यवसाय आहे. पॅराशूट सफोला हे दोन बॅण्ड्स आपण बाजारात पहिले असतीलच. केसांसाठी तेल, शाम्पू, त्वचेसाठी लोशन, शॉवर जेल तसेच खाद्यतेल बाजारात आणि मॉलमधून विक्रीसाठी उपलब्ध असतात.
फेस व्हॅल्यू : रु. १/-
सध्याचा भाव रु. ५१४/-
मार्केट कॅप : ६६ हजार ४०० कोटी रुपये.
भाव पातळी : वार्षिक हाथ रु. ५५४/- आणि लो रु.४५५/-
बोनस शेअर्स : सन २००२ ते २०१५ दरम्यान तीन वेळा दिले आहेत.
शेअर स्प्लिटः १:२ या प्रमाणात २००७ मध्ये.
रिटर्न्स : गेल्या दहा वर्षांत तब्बल पाच पट रिटर्न्स दिले आहेत.
डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
भविष्यात संधी : उत्तम आहे. कंपनीचा व्यवसाय एफएमजीसी सेक्टरमधील पर्सनल केअर उत्पादनात असून यास मागणी उत्तमच राहते. यामुळे व्यवसायात वाढ होऊ शकते.
गुंतवणुकीसाठी इतर कंपन्यांची नावेः एमआरएफ (टायर), मारुती सुझुकी लि. मन्नपुरम फायनान्स, मुथुट फायनान्स या इतर चांगल्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक होऊ शकते.
(टीपः हे सदर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक असून कंपनीच्या भविष्यातील आर्थिक कामगिरीची कोणतीही हमी देत नाही.)