Lokmat Money > बिझनेस न्यूज > अण्वस्त्र चाचणीचे बाजारात हादरे

अण्वस्त्र चाचणीचे बाजारात हादरे

उत्तर कोरियाने केलेल्या अण्वस्त्र चाचणीचे धक्के आज जगभरातील शेअर बाजारांना बसले.

By admin | Published: September 10, 2016 05:42 AM2016-09-10T05:42:10+5:302016-09-10T05:42:10+5:30

उत्तर कोरियाने केलेल्या अण्वस्त्र चाचणीचे धक्के आज जगभरातील शेअर बाजारांना बसले.

The market for atomic tests | अण्वस्त्र चाचणीचे बाजारात हादरे

अण्वस्त्र चाचणीचे बाजारात हादरे


मुंबई : उत्तर कोरियाने केलेल्या अण्वस्त्र चाचणीचे धक्के आज जगभरातील शेअर बाजारांना बसले. आशियाई बाजारांबरोबरच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे २४८ अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे ८६ अंकांनी खाली आला.
व्यापक बाजारही घसरणीपासून दूर राहू शकला नाही. बीएसई मीडकॅप आणि स्मॉलकॅप अनुक्रमे 0.९९ टक्के आणि 0.४७ टक्के
घसरले. शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात मात्र सेन्सेक्स २६५.१४ अंकांनी म्हणजेच 0.९२ टक्क्यांनी वाढला. या आठवड्यात निफ्टीही ५७.0५ अंकांनी म्हणजेच 0.६४ टक्क्यांनी वाढला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. तथापि, नंतर तो खाली
आला. सत्राच्या अखेरीस २४८.0३ अंकांनी अथवा 0.८५ टक्क्यांनी घसरून तो २८,७९७.२५ अंकांवर
५बंद झाला. ५0 कंपन्यांचा
समावेश असलेला निफ्टी ८५.८0 अंकांनी अथवा 0.९६ टक्क्यांनी घसरून ८,८६६.७0 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्समधील ३0 पैकी २२ कंपन्यांचे समभाग घसरले. कोल इंडियाचा समभाग स्थिर राहिला. घसरलेल्या बड्या कंपन्यांत अ‍ॅक्सिस बँक, आयटीसी, एचयूएल, टाटा स्टील, हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, एचडीएफसी, बजाज आॅटो, सिप्ला, मारुती आणि एसबीआय यांचा समावेश आहे. घसरणीच्या या धामधूमित ओएनजीसी, गेल, आयटीसी आणि रिलायन्स या कंपन्यांचे समभाग वाढले. (प्रतिनिधी)
>आशिया, युरोपात आपटबार
उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र चाचणीचा सर्वाधिक फटका आशियाई बाजारांना बसला. चीन, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील बाजार 0.५५ टक्के ते १.२५ टक्के घसरले.
दक्षिण कोरियाचा कोस्पी सकाळी १.३ टक्क्यांच्या घसरणीसह उघडला होता. जपानचा निक्केईही सकाळीच घसरणीला लागला होता.
मनिला आणि जकार्ता येथील बाजारही गडगडले. युरोपातही सकाळी नरमाईचाच कल दिसून येत होता. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन येथील बाजार 0.0९ टक्के ते 0.२७ टक्क्यांपर्यंत घसरण दर्शवीत होते.

Web Title: The market for atomic tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.