Join us  

मुकेश अंबानींना एका आठवड्यात ६,७३१ कोटींचा नफा; जाणून घ्या इतर कंपन्यांची परिस्थिती काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 2:23 PM

गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील आघाडीच्या १० कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) ८२,१६९.३ कोटी रुपयांनी वाढले आहे.

गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील आघाडीच्या १० कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) ८२,१६९.३ कोटी रुपयांनी वाढले आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीला सर्वाधिक फायदा झाला आहे. गेल्या आठवड्यात मंगळवारी (४ एप्रिल) महावीर जयंती आणि शुक्रवारी (७ एप्रिल) गुड फ्रायडेनिमित्त बाजाराला सुट्टी होती. गेल्या आठवड्यात बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स ८४१.४५ अंकांनी म्हणजेच १.४२ टक्क्यांनी वधारला.

कोणत्या कंपन्यांना झाला फायदा?रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी आणि आयटीसीसह टॉप-10 सेन्सेक्स कंपन्यांपैकी आठ कंपन्यांनी बाजार मूल्यांकनात वाढ नोंदवली आहे.

HDFC बँकेचे बाजार भांडवल या आठवड्यात ३१,५५३.४५ कोटी रुपयांनी वाढून ९,२९,७५२.५४ कोटी रुपये झाले. त्याच वेळी, एचडीएफसीचे बाजार मूल्यांकन १८,८७७.५५ कोटी रुपयांनी वाढले आणि ते ५,००,८७८.६७ कोटी रुपये राहिले. दुसरीकडे, भारती एअरटेलचे बाजार भांडवल ९,५३३.४८ कोटी रुपयांनी वाढून ४,२७,१११.०७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणजेच RIL चे बाजार भांडवल रु. ६,७३१.७६ कोटींनी वाढून रु. १५,८३,८२४.४२ कोटी झाले आहे आणि TCS चे बाजार भांडवल रु. ५,८१७.८९ कोटींनी वाढून रु. ११,७८,८३६.५८ कोटी इतके झाले आहे.

इन्फोसिसचे नुकसानदुसरीकडे, ITC चे बाजार मूल्यांकन ४,७२२.६५ कोटी रुपयांनी वाढून ४,८१,२७४.९९ कोटी रुपये झाले आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे बाजारमूल्य ३,७९२.९६ कोटी रुपयांनी वाढून ४,७१,१७४.८९ कोटी रुपये झाले आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) चे बाजार भांडवल १,१३९.५६ कोटी रुपयांनी वाढून ६,०२,३४१.२२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या प्रवृत्तीच्या विरोधात, इन्फोसिसचे बाजार भांडवल २,३२३.२ कोटी रुपयांनी घसरून ५,८९,९६६.७२ कोटी रुपयांवर आले. ICICI बँकेचे भांडवल १,७८०.६२ कोटी रुपयांच्या तोट्यासह ६,१०,७५१.९८ कोटी रुपयांवर आले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने (RIL) टॉप १० कंपन्यांच्या यादीत पहिलं स्थान कायम राखलं आहे. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, एचडीएफसी, आयटीसी, एसबीआय त्यानंतर अनुक्रमे भारती एअरटेल यांचा नंबर आहे.

एमपीसीच्या बैठकीनंतर, आरबीआयच्या व्याजदरात कोणताही बदल न ठेवण्याच्या निर्णयानंतर भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी उसळी घेतली. NSE निफ्टी ४२ अंकांनी वाढून १७,५९९ वर बंद झाला. तर BSE सेन्सेक्स १४३ अंकांनी वाढून ५९,८३२ वर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक ४१ अंकांच्या वाढीसह ४१,०४१ अंकांवर बंद झाला.

टॅग्स :मुकेश अंबानी