Join us  

Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 10:26 AM

Market Cap : सेन्सेक्समधील टॉप १० पैकी पाच कंपन्यांचं मार्केट कॅप (Market Cap) गेल्या आठवड्यात एकूण ८५,५८२.२१ कोटी रुपयांनी वाढलं. शेअर बाजारातील सकारात्मक ट्रेंडमुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाला (एलआयसी) सर्वाधिक फायदा झाला आहे.

Market Cap : सेन्सेक्समधील टॉप १० पैकी पाच कंपन्यांचं मार्केट कॅप (Market Cap) गेल्या आठवड्यात एकूण ८५,५८२.२१ कोटी रुपयांनी वाढलं. शेअर बाजारातील सकारात्मक ट्रेंडमुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाला (एलआयसी) सर्वाधिक फायदा झाला आहे. गेल्या आठवड्यात बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स २९९.४१ अंकांनी म्हणजेच ०.३९ टक्क्यांनी वधारला. १३ जून रोजी सेन्सेक्सनं ७७,१४५.४६ अंकांचा उच्चांक गाठला होता.दरम्यान, आठवड्याभराच्या कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि एलआयसी यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसीच्या  मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण झाली. या पाच कंपन्यांचं बाजारमूल्य मिळून ८४,७०४.८१ कोटी रुपयांनी घसरलं.

'या' कंपन्यांना नफा 

आठवडाभरात एलआयसीचं बाजार मूल्य ४६,४२५.४८ कोटी रुपयांनी वाढून ६,७४,८७७.२५ कोटी रुपयांवर पोहोचलं. एलआयसीला सर्वाधिक फायदा झाला. एचडीएफसी बँकेचं बाजार मूल्य १८,६३९.६१ कोटी रुपयांनी वाढून १२,१४,९६५.१३ कोटी रुपयांवर पोहोचलं. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार मूल्यात या आठवड्यात १०,२१६.४१ कोटी रुपयांची भर पडली आणि त्यांचं मूल्यांकन १९,९८,९५७.८८ कोटी रुपयांवर पोहोचलं. 

भारतीय स्टेट बँकेचे बाजार मूल्य ९,१९२.३५ कोटी रुपयांनी वाढून ७,४९,८४५.८९ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. तर भारती एअरटेलचं मूल्यांकन १,१०८.३६ कोटी रुपयांनी वाढून ८,११,५२४.३७ कोटी रुपयांवर पोहोचलंय. 

'या' कंपन्यांना नुकसान 

याउलट हिंदुस्थान युनिलिव्हरचं मूल्यांकन २२,८८५.०२ कोटी रुपयांनी घसरून ५,८२,५२२.४१ कोटी रुपयांवर आलं. तर टीसीएसचं मूल्यांकन २२,०५२.२४ कोटी रुपयांनी घसरून १३,८६,४३३.०५ कोटी रुपयांवर, इन्फोसिसचं मूल्यांकन १८,६००.५ कोटी रुपयांनी घसरून ६,१८,०३०.३७ कोटी रुपयांवर आले. तर दुसरीकडे आयसीआयसीआय बँकेचं मूल्यांकन ११,१७९.२७ कोटी रुपयांनी घसरून ७,७७,७९५.९० कोटी रुपयांवर, तर आयटीसीचं मूल्यांकन ९,९८७.७८ कोटी रुपयांनी घसरून ५,३८,२१६.३४ कोटी रुपयांवर आलंय.टॉप १० कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिले स्थान कायम राखले आहे. टीसीएस, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एलआयसी, इन्फोसिस, एचयूएल आणि आयटीसी या कंपन्यांच्या क्रमवारीत आरआयएल पहिल्या स्थानावर आहे.

टॅग्स :रिलायन्सएलआयसीशेअर बाजार