Lokmat Money > बिझनेस न्यूज > चार कंपन्यांचे बाजार भांडवल सपाट्याने घसरले

चार कंपन्यांचे बाजार भांडवल सपाट्याने घसरले

देशातील प्रमुख दहापैकी चार कंपन्यांच्या बाजार भांडवलाला (मार्केट कॅप) मागील आठवड्यात ४०,७७९ कोटी रुपयांचा तोटा झाला.

By admin | Published: September 12, 2016 01:03 AM2016-09-12T01:03:12+5:302016-09-12T01:03:12+5:30

देशातील प्रमुख दहापैकी चार कंपन्यांच्या बाजार भांडवलाला (मार्केट कॅप) मागील आठवड्यात ४०,७७९ कोटी रुपयांचा तोटा झाला.

The market capitalization of four companies fell flat | चार कंपन्यांचे बाजार भांडवल सपाट्याने घसरले

चार कंपन्यांचे बाजार भांडवल सपाट्याने घसरले

नवी दिल्ली : देशातील प्रमुख दहापैकी चार कंपन्यांच्या बाजार भांडवलाला (मार्केट कॅप) मागील आठवड्यात ४०,७७९ कोटी रुपयांचा तोटा झाला. टीसीएसला सर्वाधिक नुकसान झाले. नुकसान झालेल्या कंपन्यांत टीसीएससह आयटीसी, एचडीएफसी आणि कोल इंडिया यांचा समावेश आहे. टीसीएसचे बाजार मूल्यांकन ३१,७२३ कोटींनी घटून ४,६३,५४३ कोटी रुपये झाले आहे. टीसीएसचा शेअर गुरुवारी पाच टक्क्यांनी घसरला आणि त्याचे बाजार मूल्यांकन २४,७९७ कोटींनी घटले. आयटीसीचे बाजार मूल्यांकन ४,५३७ कोटींनी घटून ३,१३,०१७ कोटी रुपयांवर आले. तर एचडीएफसीचे मूल्यांकन ४,२९७ कोटींनी घटून २,२३,३२७ कोटी रुपये झाले आहे. कोल इंडियाचे मूल्यांकन २२१ कोटींनी घटून २,०९,७९८ कोटी झाले. ओनजीसी व रिलायन्सचे मूल्यांकन वाढून अनुक्रमे २,१७,६५१ कोटी व ३,३८,४८२ कोटी झाले
आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The market capitalization of four companies fell flat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.