Join us

चार कंपन्यांचे बाजार भांडवल सपाट्याने घसरले

By admin | Published: September 12, 2016 1:03 AM

देशातील प्रमुख दहापैकी चार कंपन्यांच्या बाजार भांडवलाला (मार्केट कॅप) मागील आठवड्यात ४०,७७९ कोटी रुपयांचा तोटा झाला.

नवी दिल्ली : देशातील प्रमुख दहापैकी चार कंपन्यांच्या बाजार भांडवलाला (मार्केट कॅप) मागील आठवड्यात ४०,७७९ कोटी रुपयांचा तोटा झाला. टीसीएसला सर्वाधिक नुकसान झाले. नुकसान झालेल्या कंपन्यांत टीसीएससह आयटीसी, एचडीएफसी आणि कोल इंडिया यांचा समावेश आहे. टीसीएसचे बाजार मूल्यांकन ३१,७२३ कोटींनी घटून ४,६३,५४३ कोटी रुपये झाले आहे. टीसीएसचा शेअर गुरुवारी पाच टक्क्यांनी घसरला आणि त्याचे बाजार मूल्यांकन २४,७९७ कोटींनी घटले. आयटीसीचे बाजार मूल्यांकन ४,५३७ कोटींनी घटून ३,१३,०१७ कोटी रुपयांवर आले. तर एचडीएफसीचे मूल्यांकन ४,२९७ कोटींनी घटून २,२३,३२७ कोटी रुपये झाले आहे. कोल इंडियाचे मूल्यांकन २२१ कोटींनी घटून २,०९,७९८ कोटी झाले. ओनजीसी व रिलायन्सचे मूल्यांकन वाढून अनुक्रमे २,१७,६५१ कोटी व ३,३८,४८२ कोटी झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)