मुंबई : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी संसदेत सादर केलेल्या २०१७-१७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर मुंबई आणि राष्ट्रीय बाजाराने पसंतीची मोहोर उमटवली. विविध क्षेत्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रस्ताव एकापाठोपाठ कानी पडताच शेअर बाजारात उत्साहाला उधाण आले. वित्तीय शिस्तीही हमी देत विदेशी नोंदणीकृत गुंतवणुकदारांना (वर्ग १ आणि २) अप्रत्यक्ष अंतरण करसंदर्भातील स्पष्टतेमुळे विदेशी गुंतवणुकदार कमालीचे सुखावल्याने भारतीय शेअर बाजारातील उत्साह द्विगुणित झाला. परिणामी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने तीन महिन्यानंतर उच्चांक पातळी गाठली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (बीएसई) ४८५.६८ अंकांनी उसळी घेत २८, १४१.६४ वर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही (निफ्टी) दिवसअखेर १५५.१० अंकांनी झेपावत ८,७१६.४० वर पोहोचला. २५ आॅक्टोबर २०१६ नंतर बीएसई व निफ्टीने पहिल्यांदाच हा मोठा पल्ला गाठला.
सरकारने किफायतशीर गृहनिर्माण क्षेत्राला पायाभूत क्षेत्राचा दर्जा देण्याच्या घोषणेने डीएलएफ, गोदरेज प्रॉपर्टीज, एचडीआयएल, ओबेराय रियल्टी, युनिटेकचे शेअर्स वधारले. शेअर्सवरील दीर्घावधी भांडवली लाभ करात कोणताही बदल न केल्याने सौद्यावरील खर्चासंदर्भातील गुंतवणुकदारांच्या मनातील भीतीच दूर
झाली. केंद्रीय अर्थसंकल्पाने शेअर
बाजाराला सकारात्मक गती दिली. पायाभूत विकासाचेही गुंतवणुकदारांनी स्वागत केले, असे जिओजित बीएनपी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या संशोधन विभागाचे प्रमुख विनोद नायर म्हणाले.
अर्थसंकल्पाला बाजाराची पसंती
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी संसदेत सादर केलेल्या २०१७-१७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर मुंबई आणि राष्ट्रीय बाजाराने पसंतीची मोहोर उमटवली. विविध क्षेत्रासाठी
By admin | Published: February 2, 2017 12:14 AM2017-02-02T00:14:07+5:302017-02-02T00:14:07+5:30