मुंबई : रिझर्व्ह बँकेचे चकित करणारे पतधोरण आणि जागतिक बाजारातील तेजीमुळे भारतीय शेअर बाजारातील उत्साह दुणावला. गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बुधवारी दिवसअखेर ३७६.१७ अंकांनी झेपावत २६,१५४.८३ वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (निफ्टी) निर्देशांक १०५.६० अंकांनी वधारत ७,९४८.९० वर पोहोचला.
भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरणाचा आढावा घेतल्यापासून शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी रिझर्व्ह बँकेन रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्याची कपात केल्याने गुंतवणूकदारांत उत्साह संचारला आहे. याशिवाय जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरण आणि रुपयाच्या मजबुतीमुळे भारतीय शेअर बाजाराला बळ मिळाले.
एकाच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १ टक्क्याने वधारण्याची तीन आठवड्यांतील ही पहिलीच वेळ होय. गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्स ५३८ अंकांनी वधारला.
--------------
भारती एअरटेल, भेल, गेल, कोल इंडिया, हिंदुस्थान लिव्हर आणि इन्फोसिसचे शेअर फायद्यात राहिले. तथापि, एसबीआय, अॅक्सिस बँकेचे शेअर मात्र घसरले. बीएसई-३० निर्देशांकातील २४ कंपन्यांचे शेअर्स नफ्यात राहिले. आशियातील बाजारातही सकारात्मक वातावरण होते.
बाजारात उत्साह; सेन्सेक्स ३७६ अंकानी वधारला
रिझर्व्ह बँकेचे चकित करणारे पतधोरण आणि जागतिक बाजारातील तेजीमुळे भारतीय शेअर बाजारातील उत्साह दुणावला. गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक
By admin | Published: October 1, 2015 12:01 AM2015-10-01T00:01:26+5:302015-10-01T00:01:26+5:30