मार्चअखेर बाजारात उत्साहाने झाली आहे. या वर्षभरामध्ये बाजार बराचसा दोलायमान होता. ऑगस्ट महिन्यामध्ये प्रमुख निर्देशांकांनी उच्चांकी धडक मारली असली तरी त्यानंतर मात्र मोठी घसरण बघावयास मिळाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेली रोखतेची चणचण, प्रमुख बॅँकांनी केलेली व्याज दरवाढ यामुळे परकीय वित्तसंस्थांनी पैसे काढून घेतले. मात्र कॅलेंडर वर्षाच्या प्रारंभापासून पुन्हा भारतामध्ये गुंतवणूक वाढत आहे.
मुंबई शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ घसरणीने झाला असला तरी त्यानंतर मात्र बाजार वाढता राहिला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३८,७४८.५४ ते ३७,६६७.४० अंशांदरम्यान हेलकावत अखेरीस मागील सप्ताहापेक्षा ५०८.३०
अंशांची (१.३३ टक्के) वाढ
नोंदवित ३८,६७२.९१ अंशांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजारातही सप्ताहात तेजी राहिली. येथील व्यापक पायावरील निर्देशांक (निफ्टी) सप्ताहात १६७ अंश (१.४५ टक्के) वाढून ११,६२३.९० अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांना या सप्ताहामध्ये वाढीची संधी मिळाली. सप्ताहाच्या अखेरीस मिडकॅप निर्देशांक ४०२.७३ अंशांनी वधारून १५,४७९.६२ अंशांवर बंद झाला.
स्मॉलकॅपमध्येही २६८.५६ अंशांची वाढ झाली. तो १५,०२७.३६ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅपने पुन्हा १५ हजारांची पातळी गाठली हे या सप्ताहाचे वैशिष्ट्य होय.
आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतामधील गुंतवणूक काढून घेण्यालाच प्राधान्य दिलेले दिसते. गेल्या दोन महिन्यांपासून या संस्थांकडून मोठी खरेदी होत आहे.
मात्र संपूर्ण वर्षाचा विचार करता परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारामधून ४४,५०० कोटी रुपये काढून घेतलेले आहेत. अमेरिकेमध्ये झालेली व्याजदरातील वाढ हे यामागचे प्रमुख कारण असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा मंदावलेला विकास दर आणि राजकीय अस्थिरताही याला कारणीभूत आहेत. आगामी निवडणुकीनंतर सत्तांतर न होण्याचा या संस्थांचा होरा असल्यानेच त्यांनी गुंतवणूक वाढविली आहे.
सेन्सेक्सचा आठवडा
तिसऱ्या वर्षी सेन्सेक्स, निफ्टीची दोन अंकी वाढ
च्मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) आणि राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने सलग तिसऱ्या वर्षी दोन अंकी वाढ दिली आहे.आर्थिक वर्षाच्या अखेरीस सेन्सेक्सने १७ तर निफ्टीने १५ टक्के वाढ नोंदविली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मात्र या आर्थिक वर्षामध्ये घट झालेली बघावयास मिळाली.
च्या वर्षामध्ये सेन्सेक्सने ५७०४ अंशांची उडी घेतली. ही वाढ १७ टक्के आहे. मागील वर्षामधील वाढ ११.३ टक्के होती. निफ्टी वर्षभरामध्ये १५१० अंश म्हणजे १५ टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षामध्ये त्यात १०.२ टक्क्यांची वाढ बघावयास मिळाली होती.
च्बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांक असलेले मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांना मात्र या वर्षामध्ये फटका बसला आहे. हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे तीन आणि १२ टक्के घसरले आहेत. आधीच्या वर्षी या दोन्ही निर्देशांकांमध्ये अनुक्रमे ५० आणि ६१ टक्के अशी प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली होती. त्यावर्षामध्ये त्यांनी सेन्सेक्स आणि निफ्टीलाही मागे टाकले होते.