राम जाधव, जळगावकृषी उत्पन्न बाजार समितीत या आठवड्यात नव्या लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली़ त्याला १२ ते २० रुपये प्रती किलो दराने ठोक भाव मिळाला़ हा कांदा किरकोळ बाजारात २० ते ३० रुपये प्रती किलो दराने विक्री होत आहे़ सणाच्या पार्श्वभूमीवर कांद्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी ग्राहकांना रडविणारा कांदा आता नरमला आहे़ जिल्ह्णातील शेतकऱ्यांसह धुळे, नंदुरबार व दोंडाईचा येथील शेतकऱ्यांनी नवा कांदा विक्रीसाठी आणला होता़ दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांकडून बाजारात कमी मालाची आवक होईल, यामुळे इतर राज्यातील व्यापारिवर्गाकडून मागणी वाढल्याने गुरुवारी कांद्याचे भाव १५ ते २२ रुपयांपर्यंत गेले होते़ जळगावातून काही व्यापारी हा कांदा छत्तीसगड, मध्य प्रदेश व बंगाल आदी राज्यात विक्रीसाठी पाठवतात़ तर जिल्ह्णासह इतर ठिकाणीही या कांद्याची विक्री होत आहे़ नवा कांदा आल्याने बाजारातील आवक ५० टक्क्यांपर्यंत वाढली आहे़ त्यामुळे चढलेले कांद्याचे दर सध्या प्रतिनुसार १० ते २० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत़ पर्जन्यमान व्यवस्थित नसल्याने या वर्षी कांद्याची प्रत मात्र ढासळली आहे़ कांद्याची वाढ पूर्णपणे न झाल्याने एकरी उत्पादनात मोठी घट झाली आहे़ त्यामुळे यावर्षी थोड्याफार वाढीव फरकाने भाव मिळूनही शेतकरीवर्गात नाराजीचा सूर आहे़एकरी २०० गोण्यांपेक्षा जास्त होणारा कांदा या वर्षी केवळ ६० ते ८० गोण्याच उतरत आहे़ त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा पाच ते दहा रुपये जरी भाव जास्त मिळत असला, तरी एकूण उत्पन्नातच घट आल्याने, शेतकरीवर्गाचे नुकसानच होत आहे़बाजार समितीत मंगळवार, बुधवार व गुरुवारी दररोज १५०० क्विंटलपेक्षा जास्त कांद्याची आवक झाली़ त्याला १० ते २२ रुपये प्रती किलोच्या दरम्यान गुणवत्तेनुसार भाव मिळाला़ नवीन कांद्याच्या आवकीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून दरवाढीने डोळ्यात अश्रू आणणारा कांदा सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आला आहे. सर्वसामान्यांसह नोकर वर्गालाही आता दिलासा मिळणार आहे़ किरकोळ बाजारात या नव्या कांद्याची २० ते ३० रुपये प्रतीकिलो गुणवत्तेनुसार विक्री होत आहे़
नवा कांदा आल्याने बाजार नरमला
By admin | Published: November 09, 2015 12:51 AM