मुंबई : अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा अकस्मात झालेला विजय आणि भारत सरकारने हजार-पाचशेच्या नोटांवर घातलेली बंदी, यामुळे बुधवारी जगभरातील शेअर बाजारात भूकंप झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३३९ अंकांनी आपटला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही खाली आला.
डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेली घसरणही शेअर बाजारातील आपटीला कारणीभूत ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘जिओजीत बीएनपी परिबास फायनान्शिअ सर्व्हिसेस’चे मुख्य संशोधक विनोद नायर यांनी सांगितले की, भारत सरकारने काल हजार-पाचशेच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे बाजार घसरणार होताच. ट्रम्प यांच्या विजयाने बाजाराला दुहेरी फटका बसला. सकाळी बाजारात ऐतिहासिक आपटी बसली होती. तथापि, नंतर त्यात सुधारणा होऊन घसरण मर्यादित झाली.
३0 कंपन्यांचा सेन्सेक्स ३३८.६१ अंकांनी अथवा १.२३ टक्क्यांनी घसरून २७,२५२.५३ अंकांवर बंद झाला. काल सेन्सेक्स ३१६.९९ अंकांनी वाढला होता. ५0 कंपन्यांचा निफ्टी १११.५५ अंकांनी अथवा १.३१ टक्क्यांनी घसरून ८,४३२.00 अंकांवर बंद झाला. बीएसई मिडकॅप १.८५ टक्क्यांनी, तर स्मॉलकॅप १.८५ टक्क्यांनी खाली आला.
ट्रम्प इफेक्टचा फायदा-तोटा
ट्रम्प यांच्या विजयामुळे सेन्सेक्स एका क्षणी १,६८९ अंकांनी घसरला होता. ही १५ महिन्यांतील सर्वांत मोठी इन्ट्रा डे घसरण ठरली होती. या पूर्वी २४ आॅगस्ट २0१५ रोजी सेन्सेक्सने १,७४१.३५ अंकांची घसरण नोंदविली होती. निफ्टीनेही सकाळी ५४१ अंकांची इन्ट्रा डे घसरण नोंदविली. नंतर दोन्ही निर्देशांकांत मोठी सुधारणा झाली.
रिअल्टी, टिकाऊ ग्राहक वस्तू, आयटी, टेक, आॅटो, एफएमसीजी, इंडस्ट्रियल्स, ऊर्जा, वित्त आणि टेलिकॉम या क्षेत्रांत मोठी घसरण झाली. ट्रम्प यांच्या विजयामुळे आरोग्य, बँकिंग, तेल व गॅस यांसारख्या काही क्षेत्रांना लाभही झाला. त्यामुळे घसरण थोडी भरून निघाली.
२0 कंपन्यांना फटका
सेन्सेक्समधील ३0 पैकी २0 कंपन्यांचे समभाग घसरले. १0 कंपन्यांचे समभाग वाढले. टीसीएसचा समभाग सर्वाधिक ४.९३ टक्क्यांनी घसरला. त्या खालोखाल मारुती, हीरो मोटोकॉर्प, एमअँडएम, अदाणी पोर्ट्स, बजाज आॅटो, एचडीएफसी, आयटीसी, इन्फी, टाटा स्टील, एचयूएल यांचे समभाग घसरले. डॉ. रेड्डीचे समभाग ५.0४ टक्क्यांनी वाढला. सन फार्मा, एसबीआय, पॉवर ग्रीड, गेल आणि लुपीन यांचे समभागही वाढले.
तत्काळ परिणाम काय होणार?
५०० आणि १ हजारच्या नोटा रद्द झाल्यामुळे बाजारात चलनघट म्हणजे नोटांचा तुटवडा निर्माण होईल. ज्यांनी तस्करी, भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसा जमवला आहे, ते कारवाईच्या भीतीने ते पैसा जाहीर करणार नाहीत. अर्थव्यवस्थेमध्ये नोटा कमी होतील. दहा, पन्नास व १०० रुपयांच्या नोटांची मागणी होईल.
हे फायदे होतील
1या एकाच निर्णयामुळे सरकारला
काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि बनावट नोटा रोखण्यात यश येईल.
2पैशाअभावी शस्त्रास्त्रे तस्करी, हेरगिरी आणि दहशतवादाच्या कारवायांवर नियंत्रण येईल.
3एटीएममधून दरदिवशी केवळ २ हजार रुपये काढता येतील. बँक खात्यातून दिवसांला १० हजार आणि आठवड्यातून २० हजार काढता येतील. त्यामुळे कार्डने पेमेंट करण्याकडे कल वाढेल.
4येत्या दिवसांमध्ये पॅनकार्ड, आधारकार्ड आणि निवडणूक कार्डावरून जास्तीत जास्त पेमेंट होणार असल्याने सरकारला या व्यवहारांवर अधिक बारकाईने लक्ष ठेवता येईल. बँकामध्ये होणाऱ्या व्यवहारांवर आयकर खात्याची विशेष नजर असेल.
काय अडचणी
1५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी बँकेमध्ये जावे लागेल. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये बँकांमध्ये गर्दीचा सामना करावा लागेल.
2५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटांच्या जागी १०० रुपयांच्या जास्त नोटा छापाव्या लागतील. अतिरिक्त नोटांच्या छपाईसाठी आरबीआयला ११,९०० कोटी रुपये जास्त खर्च येईल. एटीएम आॅपरेशन्सचा खर्चही वाढेल. एटीएम यंत्र १०० रुपयांच्या नोटांनी भरून ठेवावे लागेल.
3निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या कार्डने व्यवहार करत नाही, त्यांना त्रास होईल. 4दिवसा
५०, १०० रुपये मानधन असलेल्यांना फटका बसेल.
5ज्यांचा काळा पैसा परकीय चलनात, सोन्यामध्ये आणि कर सुरक्षितता असलेल्या परदेशी बँकांमध्ये आहे, त्यांचा पैसा कसा बाहेर काढणार?
ट्रम्प इफेक्टमुळे बाजार आपटला
अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा अकस्मात झालेला विजय आणि भारत सरकारने हजार-पाचशेच्या नोटांवर घातलेली बंदी
By admin | Published: November 10, 2016 04:58 AM2016-11-10T04:58:19+5:302016-11-10T04:58:19+5:30