नवी दिल्लीः अमेरिकेसह देशभरातील शेअर बाजारात होत असलेली घसरण आणि कोरोनाच्या प्रकोपाचा भारतीय शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1700 अंकांनी कोसळला आहे, तर निफ्टीसुद्धा 10,600च्या नीचांकी स्तरावर आला आहे. शेअर बाजारात झालेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे 5.70 लाख कोटी बुडाले आहेत. सोमवारी शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले. शुक्रवारी मुंबई शेअर बाजारातील समभागांचे एकूण कंपन्यांचं भाग भांडवल 1,44,31,224.41 कोटी रुपये होते, जे सोमवारी बाजारात झालेल्या घसरणीनंतर 5,68,393.48 कोटी रुपयांनी घसरून 1,38,62,830.93 कोटी रुपयांवर आलं आहे.
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा प्रारंभही निराशेनेच झाला होता. सप्ताहामधील एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता बाजार सातत्याने खालीच जाताना दिसून आला. बाजारातील विक्रीच्या प्रचंड दबावामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीला अनुक्रमे 38 हजार आणि 11 हजार अंशांची पातळी राखता आली नाही. शेअर बाजाराच्या सोमवारच्या घसरणीला कोरोना व्हायरस आणि रशिया-सौदी अरेबियात भडकलेलं तेलयुद्ध या घसरणीला कारणीभूत असल्याचे मानले जाते आहे. अमेरिका शिंकते, तेव्हा जगाला सर्दी झाल्यासारखे वाटू लागते, असे म्हटले जाते. कोरोनचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होण्याची भीती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली होती.
Sensex at 36,445.47, down by 1131.15 points. pic.twitter.com/eCEm5hDvd3
— ANI (@ANI) March 9, 2020
डाऊचा निर्देशांक 750 अंकांनी सुधारून बंद झाला. तर शुक्रवारी एसएंडपी 500 आणि नॅस्डॅक जवळपास 2 टक्क्यांनी घसरले होते. जगातील अव्वल क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा जोरदार फटका बसणार असल्याचे मानले जाऊ लागले. त्याचे पडसाद जगभर उमटले. कोरोनामुळे परिस्थिती सुधारत नसल्याचं चित्र आहे. तत्पूर्वी मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही मोठ्या प्रमाणात घसरण झालेली दिसून आली होती. या घसरणीमुळे अनेक समभाग खूप खाली आले. स्मॉलकॅपच्या 159 समभागांचे दर 10 ते 70 टक्क्यांच्या दरम्यान घसरलेले दिसून आले. त्यामानाने मिडकॅपला घसरणीचा बसलेला फटका कमी होता.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक पुढे होणार आहे. त्याच्या आधीच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत चिंता व्यक्त करताच फेडरल रिझर्व्हने व्याजदरामध्ये अर्धा टक्का कपात केली आहे. नियोजित वेळेपूर्वीच केलेल्या या कपातीमुळे जगभरामध्ये अमेरिकन अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचा संदेश गेला आणि गुरुवारपासून अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण सुरू झाली. ही घसरण तात्कालिक असू शकेल. मात्र गुंतवणूकदारांनी संयम बाळगणे अतिशय गरजेचे आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
रशियाला 'धडा' शिकवण्यासाठी सौदी अरेबिया मैदानात; कच्च्या तेलाच्या किमतीत 30 टक्के कपात
पेट्रोलचे दर नऊ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर; जाणून घ्या आजचे भाव
चांदमिया पाटील, तुम्ही छाती फाडण्याची गरज नाही; शिवसेनेचा 'राम'बाण
कोरोनामुळे पंतप्रधान मोदींचा बांगलादेश दौरा रद्द
लंडनमधली 'ती' लढणार बिहारची निवडणूक; स्वतःची सीएमपदाची उमेदवार म्हणून घोषणा