Join us

Share Market Investment - बाजारनीती : छप्परफाड रिटर्न्स... क्षणिक की दीर्घकालीन ?

By पुष्कर कुलकर्णी | Published: September 26, 2022 11:00 AM

क्षणिक मिळणारे रिटर्न्स आणि त्यातील गुंतवणूक धोक्याची सुद्धा ठरू शकते.

शेअर बाजार हा असा गुंतवणूक व्यवसाय आहे जिथे अनेकांना छप्परफाड रिटर्न्स मिळाले आहेत आणि भविष्यातही मिळतील; परंतु हे रिटर्न्स क्षणिक आहेत की दीर्घकालीन हे अत्यंत महत्त्वाचे असते. क्षणिक मिळणारे रिटर्न्स आणि त्यातील गुंतवणूक धोक्याची सुद्धा ठरू शकते.

जे बाजारात स्थिर मनाने, अभ्यासपूर्ण गुंतवणूक करतात आणि दीर्घ काळ टिकून राहतात त्यांना शक्यतो नुकसान सोसावे लागत नाही; परंतु क्षणिक मोहाला बळी पडणारे आणि चंचल मनाने अर्ध्या हळकुंडाने पिवळी होण्याची स्वप्ने पाहणारे गुंतवणूकदार कधी फायदा, तर कधी तोटा याच चक्रात अडकून राहतात. अशा गुंतवणूकदारांसाठी बाजार हे एक प्रकारचे व्यसन असते आणि ते त्याच विचाराने बाजाराकडे पाहतात. छप्परफाड फायदा तर सोडाच, परंतु असे गुंतवणूकदार बाजारास आपले पैसे देऊन बाहेर पडतात.

बाजारनीती या शेवटच्या सदरात छप्परफाड रिटर्न्ससाठी काही टिप्स

  • कमी वयात शेअर बाजारात गुंतवणूक सुरू करा.
  • प्रत्येक महिन्यात दीर्घ काळासाठी ठरावीक रक्कम बाजूला काढा.
  • बाजाराशी निगडित टेक्निकल आणि फंडामेंटल या
  • दोनही टुल्सचा बेसिक अभ्यास करा. यामुळे एंट्री आणि
  • एक्झिटचे निर्णय योग्य पद्धतीने घेता येतात.
  • जो व्यवसाय स्वतःला समजतो अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करा.
  • मनाची स्थिरता ठेवा. बाजारात चढउतार हे होणारच.
  • प्रत्येक महिन्यात आपल्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू घ्या.
  • क्षणिक फायद्याच्या मोहात पडू नका.
  • पेनी स्टॉकच्या मोहात पडू नका.
  • अविश्वसनीय माहितीस्रोतावर विश्वास ठेवून गुंतवणूक करू नका.
  • दीर्घकालीन गुंतवणूक छप्परफाड रिटर्न्स देत असते. हे कायम लक्षात ठेवा. 

वॉरेन बफे, राधाकृष्ण दमाणी आणि राकेश झुनझुनवाला ही नावे आपल्याला ठाऊक आहेतच. ते ट्रेडर्स कमी आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार होते आणि आहेत.  त्यामुळे त्यांची संपत्ती बहरली आणि फुलली. छप्परफाड रिटर्न्स मिळविण्याची खरी बाजारनीती यातच आहे. 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक