Join us

मोदी सरकारच्या डिजिटल स्ट्राइकचा परिणाम; चीनचा हिस्सा २९ टक्क्यांनी घटला

By देवेश फडके | Published: February 16, 2021 4:11 PM

भारत आणि चीन सीमेवरील तणावाच्या (India china border tension) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या डिजिटल स्ट्राइकचा परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे. अॅप मार्केटमधील चीनचा दबदबा कमी झाला असून, भारतीय अॅपचा बोलबाला वाढला असल्याचे सांगितले जात आहे. एका कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणात ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देअॅप्स मार्केटमधील चीनचा हिस्सा घटलाभारतीय अॅप्सचा बोलबाला कायमनिम-शहरी आणि ग्रामीण भागातून भारतीय अॅप्सना मोठी मागणी

नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या डिजिटल स्ट्राइकचा परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे. अॅप मार्केटमधील चीनचा दबदबा कमी झाला असून, भारतीय अॅपचा बोलबाला वाढला असल्याचे सांगितले जात आहे. एका कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणात ही बाब समोर आली आहे. (market share of chinese app shrink 29 percent after India china border tension)

मार्केटमधील चीनची हिस्सेदारी कमी झाल्याचा फायदा थेट भारतीय कंपन्यांना झाला आहे. भारत आणि चीनमधील सैनिकांमध्ये लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या हिंसक झटापटीनंतर डिजिटल स्ट्राइक करत सुरुवातीला ५९ अॅपवर बंदी घातली होती. यात टिकटॉक, हॅलो, पबजी यांसारख्या प्रचंड लोकप्रिय अॅप्सचा समावेश होता. अॅप्सफ्लायर या कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणात अॅपवर घालण्यात आलेल्या बंदीनंतर चीनची अॅप मार्केटमधील हिस्सेदारी तब्बल २९ टक्क्यांनी घटली आहे. 

धक्कादायक! वुहानमध्ये ५०० टक्क्यांहून जास्त विध्वंस, १३ प्रकारचे कोरोना: WHO

अमेरिकन, रशिया आणि इस्राइल अॅप्सचा धडाका

सन २०२० मध्ये चीनी अॅप डाऊनलोट करण्याचे प्रमाण २९ टक्क्यांनी घटले आहे. तर भारतीय अॅप डाऊनलोड करण्याचे प्रमाण ३९ टक्क्यांनी वधारले आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमेरिका, रशिया, इस्राइल, जर्मनी या देशात विकसित करण्यात आलेल्या अॅप्सच्या धडाक्याचाही चीनी अॅप्सवर परिणाम झाला आहे, असे यात म्हटले आहे. 

भारताच्या ग्रामीण भागातून मागणी अधिक

अॅप्सफ्लायर कंपनीचे भारतातील व्यवस्थापक संजय त्रिसाल यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, भारतातील निमशहरी आणि ग्रामीण भागात भारतीय अॅप्सना मोठी मागणी असल्याचे दिसून आले आहे. टियर-२ आणि टियर-३ भागातील शहरांमध्ये भारतीय अॅप्सना ८५ टक्के मागणी असल्याचेही त्रिसाल यांनी सांगितले. भारतीय कंपन्यांनी विकसित केलेल्या गेमिंग, फिनटेक आणि मनोरंजन गटातील अॅप्स निम-शहरी आणि ग्रामीण भागात सर्वांत लोकप्रिय आहेत. छोट्या शहरात भारतीय अॅप्सच्या डाऊनलोडिंगचे प्रमाण जास्त आहे, असेही संजय त्रिसाल यांनी यावेळी बोलतान सांगितले.

टॅग्स :भारत-चीन तणावसीमा वादमोबाइल