Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजार दुस-या दिवशीही विक्रमी उंचीवर!

शेअर बाजार दुस-या दिवशीही विक्रमी उंचीवर!

शेअर बाजारांनी गुरुवारी सलग दुस-या सत्रात विक्रमी उंची गाठली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३५,२६० अंकांवर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०,८१७ अंकांवर बंद झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 01:52 AM2018-01-19T01:52:02+5:302018-01-19T01:52:45+5:30

शेअर बाजारांनी गुरुवारी सलग दुस-या सत्रात विक्रमी उंची गाठली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३५,२६० अंकांवर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०,८१७ अंकांवर बंद झाला

The market is still at a record high on the second day! | शेअर बाजार दुस-या दिवशीही विक्रमी उंचीवर!

शेअर बाजार दुस-या दिवशीही विक्रमी उंचीवर!

मुंबई : शेअर बाजारांनी गुरुवारी सलग दुस-या सत्रात विक्रमी उंची गाठली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३५,२६० अंकांवर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०,८१७ अंकांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांचा हा सार्वकालिक विक्रमी बंद ठरला.
आजच्या तेजीचा बँकांच्या समभागांना मोठा लाभ मिळाल्याचे दिसून आले. खासगी बँकांसाठी थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा १०० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा विचार सरकार करीत असल्याचे वृत्त असून, त्यामुळे बँकांचे समभाग वाढले आहेत, असे बाजारातील सूत्रांनी सांगितले. वित्तीय तूट वाढल्यामुळे सरकारने काल चालू वित्त वर्षातील अतिरिक्त उसनवाºया ५० हजार कोटींवरून २० हजार कोटींवर मर्यादित ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचाही लाभ बाजारांना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७८ अंकांनी अथवा ०.५१ टक्क्याने, तर राष्टÑीय शेअर बाजाराचा निफ्टी २८ अंकांनी अथवा ०.२६ टक्क्याने वाढला. सेन्सेक्स ३५.२६०.२९ अंकांवर बंद झाला. आदल्या सत्राचा ३५,०८१.८२ अंकांचा विक्रम त्याने मोडला. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्स ३१०.७७ अंकांनी वाढला आहे. १०,८१७ अंकांवर बंद होताना निफ्टीने आदल्या सत्राचा १०,७८८.५५ अंकांचा उच्चांक मोडला.
सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी आयटीसीचे समभाग सर्वाधिक २.६१ टक्क्यांनी वाढले. त्याखालोखाल एचडीएफसी बँक, एचडीएफसी लि., एम अ‍ॅण्ड एम, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, बजाज आॅटो, मारुती सुझुकी, विप्रो आणि एल अ‍ॅण्ड टी यांचे समभाग वाढले.

Web Title: The market is still at a record high on the second day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.