Share market news : भारतासह जगातील अनेक देशांवर आजपासून ट्रम्प टॅरिफ लागू झाले. याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारात पाहायला मिळाला. यातून भारतीय शेअर बाजारही सुटला नाही. आयटी आणि ऑटोसह अनेक क्षेत्रांमध्ये प्रचंड विक्री झाली, तर फार्मा समभागांमध्ये वाढ दिसून आली. दिवसाच्या अखेरीस शेअर बाजार लाल रंगात बंद झाला. आजच्या व्यवहारात, सेन्सेक्स ३२२ अंकांनी घसरुन ७६,२९५ च्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी ९० अंकांनी घसरल्याने २३,२४२ च्या पातळीवर बंद झाला.
या शेअर्समध्ये वाढ
एनएसई समभागांमध्ये आज सर्वात मोठी वाढ वर्धमान टेक्सटाइल्समध्ये २० टक्के, मारल ओव्हरसीजमध्ये १९.९९ टक्के, बाल फार्मामध्ये १९.९९ टक्के, ऑर्चस्प लिमिटेडमध्ये १९.८१ टक्के आणि AKME FINTRADE मध्ये १६.५२ टक्के होती. तर दुसरीकडे पोकर्णामध्ये २० टक्के आणि अवंती फीड्समध्ये १५.२५ टक्क्यांनी सर्वाधिक घट नोंदवली गेली.
या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
आयटी कंपनी टीसीएसच्या शेअर्समध्ये ३.९८% ची मोठी घसरण नोंदवली गेली आहे. तो ३४०३ च्या पातळीवर बंद झाले, तर टेक महिंद्राचे शेअर ३.७८% नी घसरले असून ते १३६९ च्या पातळीवर बंद झाले. यानंतर, एचसीएल टेक शेअर्स ३.७७% घसरले आणि १४७० रुपयांवर बंद झाले, तर इन्फोसिसचे शेअर्स ३.४७% घसरले आणि १४९७ रुपयांवर बंद झाले. याशिवाय ओएनजीसीचे शेअर्स २.९३% कमकुवत होत २४३.३१ च्या पातळीवर बंद झाले.
वाचा - रिलायन्सची गेमिंग क्षेत्रात एन्ट्री! ई-स्पोर्ट्स व्यवसायासाठी BLAST सोबत हातमिळवणी, कशी आहे योजना?
आयटी क्षेत्रात प्रचंड विक्री
क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास, आज निफ्टी आयटीने सर्वाधिक ४.२१ टक्क्यांची घसरण नोंदवली. याशिवाय निफ्टी ऑटो १.१४ टक्के, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस २५/५० ०.०३ टक्के, निफ्टी मेटल ०.८२ टक्के, निफ्टी रियल्टी ०.१० टक्क्यांनी घसरले. निफ्टी ऑइल अँड गॅस ०.४९ टक्के आणि निफ्टी मिडस्मॉल आयटी अँड टेलिकॉम ३.६१ टक्के घसरले. याशिवाय निफ्टी फार्मामध्ये सर्वाधिक २.२५ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. याशिवाय निफ्टी मीडिया १.०९ टक्के, निफ्टी एफएमसीजी ०.१९ टक्के, निफ्टी पीएसयू बँक १.९४ टक्के, निफ्टी प्रायव्हेट बँक ०.३२ टक्के आणि निफ्टी हेल्थकेअर इंडेक्स १.९८ टक्क्यांनी वधारले.