भारतीय रिझर्व्ह बॅँकेने अपेक्षेपेक्षा अधिक केलेली दरकपात तसेच डॉलरच्या तुलनेत मजबूत होत असलेल्या रुपयामुळे बाजारामध्ये उत्साह वाढला असून मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्याने बाजार तेजीत राहिला. कमी झालेला औद्योगिक विकास दर बाजाराला खरे तर हानिकारक ठरणारा असला तरी बाजार वाढीव पातळीवर बंद झाला हे सप्ताहाचे वैशिट्य मानावे लागेल.
मुंबई शेअर बाजारामध्ये केवळ चारच दिवस व्यवहार झाले. हे सर्व दिवस निर्देशांक सातत्याने वाढत असलेला दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३५७.४५ अंश म्हणजेच १.३८ टक्क्यांनी वाढून २५८६३.५0 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १.0५ टक्के म्हणजे ८२.४0 अंश वाढून ७९५0.९0 अंशांवर बंद झाला. बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदीदार दिसून आले. परकीय वित्त संस्थांनी खरेदी तसेच विक्री केली असली तरी देशांतर्गत वित्त संस्था मात्र खरेदी करीत होत्या.
भारतीय रिझर्व्ह बँकेने बाजार अनेक महिन्यांपासून अपेक्षित असलेली दर कपात मागील सप्ताहात केली. बाजाराला 0.२५ बेसीस पॉर्इंटची अपेक्षा असताना बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी 0.५0 बेसीस पॉर्इंट कपात केली. याचा बाजारावर चांगलाच परिणाम होऊन तेजीने त्याचे स्वागत झाले. यांच्याच जोडीला भारतीय चलन रुपयाचे मूल्यही वाढलेले दिसून आले.
सप्ताहात रुपयात 0.८२ टक्क्यांनी वाढून ६६.0९ वरुन ६५.५५ वर पोहचला. याचाही बाजाराला फायदाच झालेला दिसून आला.
आॅगस्ट महिन्यात देशातील आठ प्रमुख उद्योगांमधील उत्पादन घटल्याचे दिसून आले आहे. आॅगस्ट महिन्यात या उद्योगांचे उत्पादन २.६ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.
मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात हे उत्पादन ५.९ टक्के होते. त्याचबरोबर भारतीय रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील एकूण देशांतर्गत उत्पादन ७.६ टक्क्यांवरून ७.४ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. खरे तर बाजाराला काळजी वाटावी अशा या घटना आहेत, असे असूनही व्याजदर कमी होणार या एकाच अपेक्षेने बाजार वेगाने वाढताना दिसून आला.
सप्टेंबर महिन्यात परकीय वित्त संस्थांनी भारतीय शेअर बाजारातील ५९00 कोटी रुपये काढून घेतले. मात्र याचवेळेला देशांतर्गत वित्तीय संस्था आक्रमकपणे खरेदीसाठी उतरल्याने बाजार वाढताना दिसून आला. बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांक असलेले मिडकॅप आणि स्मॉलकॅप अनुक्रमे २.१ टक्का आणि 0.९ टक्क्याने वाढून बंद झालेले दिसून आले.
दरकपात, मजबूत रुपयाच्या बळावर बाजाराची झेप
भारतीय रिझर्व्ह बॅँकेने अपेक्षेपेक्षा अधिक केलेली दरकपात तसेच डॉलरच्या तुलनेत मजबूत होत असलेल्या रुपयामुळे बाजारामध्ये उत्साह वाढला असून मोठ्या प्रमाणावर खरेदी होत
By admin | Published: October 4, 2015 10:38 PM2015-10-04T22:38:46+5:302015-10-04T22:38:46+5:30