- प्रसाद गो. जोशी
भारतीय शेअर बाजार हा चांगला वाढला असून, तो आता नवनवीन उच्चांकांसाठी सिद्ध झालेला दिसत आहे. मंगळवारी जाहीर होणारे लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि त्यानंतर व्याजदराबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे धोरण यामुळे बाजार चढू शकतो.
लोकसभा निवडणुकीच्या ‘एक्झिट पोल’चे जाहीर झालेले आकडे बघता बाजाराकडून त्यावर चांगली प्रतिक्रिया येण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे देशाचा वाढलेला ‘जीडीपी’ हा गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण असल्याचे संकेत देत आहे.
निवडणुकीनंतर स्थिर सरकार आल्यास त्याचाही फायदा होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये बाजार नवनवीन शिखरे गाठताना दिसल्यास नवल नाही.
आगामी सप्ताहामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक समितीची बैठक होत असून, त्यामध्ये आगामी काळातील व्याजदरांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. आणखी काही काळ व्याजदर कायम राहण्याची अपेक्षा आहे.