Lokmat Money > बिझनेस न्यूज > मारुतीने लाँच केली बलेनो हॅचबॅक कार

मारुतीने लाँच केली बलेनो हॅचबॅक कार

हॅचबॅक अर्थात विना डिक्कीच्या कारमध्ये मारुती सुझुकी इंडियाने सोमवारी बाजारपेठेत बलेनो हॅचबॅक ही कार लाँच केली.

By admin | Published: October 26, 2015 11:23 PM2015-10-26T23:23:24+5:302015-10-26T23:23:24+5:30

हॅचबॅक अर्थात विना डिक्कीच्या कारमध्ये मारुती सुझुकी इंडियाने सोमवारी बाजारपेठेत बलेनो हॅचबॅक ही कार लाँच केली.

Maruti Launches Baleno Hatchback Car | मारुतीने लाँच केली बलेनो हॅचबॅक कार

मारुतीने लाँच केली बलेनो हॅचबॅक कार

नवी दिल्ली : हॅचबॅक अर्थात विना डिक्कीच्या कारमध्ये मारुती सुझुकी इंडियाने सोमवारी बाजारपेठेत बलेनो हॅचबॅक ही कार लाँच केली. या कारची किंमत दिल्लीत ४.९९ लाख ते ८.११ लाख रुपयांदरम्यानआहे.
ही कार कंपनीच्या हरियाणातील मानेसरच्या प्लांटमध्ये तयार होणार आहे. मारुती आणि त्यांच्या सहयोगी कंपनीने या मॉडेलसाठी १०६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पेट्रोलवरील कारचे अ‍ॅव्हरेज २१.४ प्रति लिटर, तर डिझेल कारचे अ‍ॅव्हरेज २७.३९ कि़मी. एवढे आहे.
बलेनो हॅचबॅकच्या पेट्रोल कारची किंमत ४.९९ ते ७.०१ लाख रुपये आहे. डिझेल कारची किंमत ६.१६ ते ८.११ लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी संचालक आर.एस. कलसी म्हणाले की, कारचे हे मॉडेल आपल्या श्रेणीमध्ये सर्वात टॉपवर राहील याचा आम्हाला विश्वास आहे.
बलेनोची बाजारपेठेत ह्युंदाईची आय २०, होंडाची जॅज आणि फोक्सवॅगनची पोलो यांच्याशी स्पर्धा असेल. प्रिमियम कॉम्पॅक्ट कारचा हिस्सा बाजारपेठेत २० टक्के इतका आहे. देशात दरवर्षी अशा पाच ते सव्वा पाच लाख कार विकल्या जातात.

Web Title: Maruti Launches Baleno Hatchback Car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.