मुंबई: फोर्टपॉइंट आॅटोमोटिव्ह ही वाहन वितरण कंपनी आणि वाहननिर्मिती करणाऱ्या मारुती सुझुकी या कंपनीने महानगर गॅस लिमिटेडशी सहकरार केला आहे. या करारांतर्गत फोर्टपॉइंट आॅटोमोटिव्हकडून ५ मारुती अर्टिगा गाड्या भाडेतत्त्वावर (आॅपरेटिव्ह लीज) चार वर्षांसाठी देण्यात आल्या आहेत.
फोर्टपॉइंट ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संदीप कुमार बाफना यांनी सांगितले, या पाच मारुती अर्टिगा आम्ही महानगर गॅस लिमिटेडला चार वर्षांसाठी ‘मारुती एन२एन’ आॅपरेटिव्ह लीजवर देत आहोत. म्हणजे या चार वर्षांत वाहनांच्या देखभालीचा खर्च हा फोर्टपॉइंट आॅटोमोटिव्ह करणार आहे. चार वर्षांनंतर हा करार संपुष्टात येईल. त्यानंतर त्याचे नूतनीकरण करता येईल. फोर्टपॉइंट आॅटोमोटिव्ह ही कंपनी गेल्या चार वर्षांपासून ‘आॅपरेटिव्ह लीजिंग’च्या क्षेत्रात कार्यरत आहे. याअगोदर एसबीआय कॅपिटल, शिपिंग कॉर्पोरेशनसारख्या मोठ्या कंपन्यांशी या कंपनीने करार केला आहे.
या प्रसंगी फोर्टपॉइंट आॅटोमोटिव्हचे व्यवस्थापकीय संचालक संदीप कुमार बाफना यांच्याबरोबर महानगर गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजीव माथूर, मारुतीचे कॉर्पोरेट सेल्सचे प्रमुख अरुण अरोरा, महानगर गॅस लिमिटेडचे उपाध्यक्ष टी. शरणागत, एमजीएलचे वित्त विभागाचे उपसंचालक राकेश चावला, फोर्टपॉइंटचे सेल्स आणि आॅपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष ऋषिकेश आचार्य उपस्थित होते. (वाणिज्य प्रतिनिधी)
मारुती सुझुकीचा महानगर गॅस लिमिटेडबरोबर सहकरार
फोर्टपॉइंट आॅटोमोटिव्ह ही वाहन वितरण कंपनी आणि वाहननिर्मिती करणाऱ्या मारुती सुझुकी या कंपनीने महानगर गॅस लिमिटेडशी सहकरार केला आहे.
By admin | Published: April 30, 2017 04:35 AM2017-04-30T04:35:50+5:302017-04-30T04:35:50+5:30