Join us

Maruti Suzuki ला CCI नं ठोठावला २०० कोटींचा दंड; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 6:35 PM

Maruti Suzuki 200 Crore Fine : सीसीआयनं मारूती सुझुकीला ठोठावला २०० कोटींचा दंड. कंपनीला साठ दिवसांच्या आत दंड भरण्याचे आदेश.

ठळक मुद्दे सीसीआयनं मारूती सुझुकीला ठोठावला २०० कोटींचा दंड. कंपनीला साठ दिवसांच्या आत दंड भरण्याचे आदेश.

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकीला मोठा झटका बसला आहे. कम्पिटीशन कमिशन ऑफ इंडियानं (सीसीआय) डिलर डिस्काउंट पॉलिसी अंतर्गत कंपनीला २०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, मारुती सुझुकीला सीसीआयने डिलर सवलतींशी संबंधित अँटी कम्पिटिटीव्ह प्रॅक्टिस करण्यास सांगितले आहे. डिलर्सद्वारे ग्राहकांना अधिक डिस्काऊंट देण्यापासून रोखलं जातं, असा आरोप कंपनीवर करण्यात आला होता. तसंच यासंदर्भातर सीसीआयनं तपास केला आणि यानंतर ही कारवाई करण्यात आली. कंपनीला हा दंड ६० दिवसांच्या आत भरावा लागणार आहे.

२०१७ मध्ये एका डिलरने CCI ला यासंदर्भात मेल केला होता तसंच यासंदर्भात तक्रार केली होती. या मेलच्या आधारे आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली. ई-मेलमध्ये डिलरने मारुती सुझुकी इंडियाचे विक्री धोरण ग्राहकांच्या हिताचे नसल्याचा आरोप केला होता. यासह, ते स्पर्धा कायदा, २००२ च्या तरतुदींच्या विरोधात असल्याचंही म्हटलं होतं.

६० दिवसांचा कालावधीसीसीआयनं एका तपासाच्या आधारावर एक आदेश जारी केला आहे. यामध्ये मारुतीला या अंतर्गत काम बंद करण्यास सांगितलं आहे. तसंच कंपनीला ठोठावण्यात आलेला दंड ६० दिवसांच्या आत भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उत्पादनात वाढयापूर्वी मारूती सुझुकीनं जुलै महिन्यात आपल्या उत्पादनात ५८ टक्क्यांची वाढ झाल्याचं म्हटलं होतं. कंपनीनं जुलै महिन्यात १,७०,७१९ युनिट्सचं उत्पादन केलं. तर गेल्या वर्षाबाबत सांगायचं झालं तर जुलै २०२० मध्ये कंपनीनं १,०७,६८७ युनिट्सचं उत्पादन केलं होतं.

टॅग्स :मारुती सुझुकीकारभारत